विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sahar Shaikh मुंब्र्याला हिरवं करायचं आहे हे विधान नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.Sahar Shaikh
मुंबईमध्ये एकीकडे भाजप शिवसेना शिंदे गट यांची युती महापालिका निवडणुकीच्या मैदानात होती, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची देखील युती पहायला मिळालं. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे तीनही पक्ष एकत्र आल्यानं त्यांच्या पक्षातील अनेक इच्छुकांचा महापालिका निवडणुकीसाठी पत्ता कापला गेला होता.Sahar Shaikh
यामध्येच एक नाव होतं ते म्हणजे सहर शेख यांचं सहर शेख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळालं नाही, त्यानंतर त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला.मुंब्रा हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आव्हाड यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांना जबरदस्त हादरला देण्याचं काम सहर शेख यांनी केलं. सहर शेख विजयी झाल्यानंतर कैसा हाराया..? असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं होतं, त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.
दरम्यान त्यानंतर त्यांनी एक मोठं विधान केलं होतं. मुंब्र्याला हिरवं करायचं आहे, अशा आशयाचे ते विधान होतं, आता त्यांच्या या वक्तव्यावरून त्या अडचणीत आल्या आहेत. पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे. ज्यामुळे समाजात असंतोष निर्माण होईल, असं भाषण करू नये, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच सोशल मीडियावर बोलताना देखील या पद्धतीचे वक्तव्य टाळा असंही पोलिसांनी म्हटलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६८ नुसार मुंब्रा पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे.
Mumbra AIMIM Corporator Sahar Shaikh in Trouble, Police Serve Notice
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin : लाडक्या बहिणींची पुन्हा झाडाझडती, २२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची तपासणी होणार
- नाद कुणाचाही करा, पण देवाभाऊ यांचा नाही, जयकुमारे गाेरे यांचा अभिजीत पाटलांना इशारा
- नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
- कामटी जि.प. गटावरून वाद पेटला; सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका!