प्रतिनिधी : निरंजन शेरकर
सोलापूर: कामटी जिल्हा परिषद गटाची जागा ही सर्वसाधारण महिला (खुला प्रवर्ग) असल्याने त्या ठिकाणी उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून आक्रमक भूमिका घेतली जात असून, इतर जातीसमूहातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील या जागेसाठी अर्ज दाखल करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत श्रीधर घनश्याम पाटील यांनी जाहीरपणे भूमिका मांडत “राखीव मतदारसंघ असतात, तेथे संबंधित प्रवर्गांनी खुशाल लढावे; मात्र खुल्या प्रवर्गात नाक खुपसण्याची गरज नाही,” असे विधान केले आहे.
श्रीधर पाटील यांनी पुढे इशारा देताना सांगितले की, “खुल्या प्रवर्गात इतर जातीसमूहाचा उमेदवार दिला गेल्यास, ज्या पक्षाचा तो उमेदवार असेल, तो थेट पाडला जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.” त्यांच्या या वक्तव्यामुळे कामटी परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, निवडणूकपूर्व वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.
या भूमिकेमुळे स्थानिक राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. एकीकडे सामाजिक संघटनांचा दबाव वाढत असताना, दुसरीकडे खुल्या प्रवर्गातील उमेदवारीबाबत पक्षांनी काय भूमिका घ्यावी, यावर चर्चा सुरू आहे. काही नेत्यांकडून संयम राखण्याचे आवाहन केले जात असले तरी, मैदानात उतरू इच्छिणाऱ्या संभाव्य उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार खुल्या प्रवर्गात सर्वांना समान संधी असल्याचे मत काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील काळात कायदेशीर आणि राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामती गटातील निवडणूक ही आता केवळ स्थानिक न राहता व्यापक चर्चेचा विषय ठरत आहे.
Controversy flares up over Kamti ZP group; Aggressive stance of entire Maratha community!
महत्वाच्या बातम्या
- पूर्व पुण्याच्या राजकारणात नवा अध्याय, रणनीती, संघटन व जनसंपर्काच्या जोरावर सुरेंद्र पठारे यांची दमदार कामगिरी
- पुण्यातला पहिला निकाल, प्रभाग क्र. २० भाजपचे तीन, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसचे प्रशांत जगताप
- मुंबईत फुलणार ११० पेक्षा जास्त कमळाची फुले, माेहित कंबाेज यांचा दावा
- पुण्यात ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ५२.४२ टक्के मतदान