Pune MahanagarPalika : पुण्याच्या कारभाराची सूत्रे ‘सावित्रीच्या लेकी’कडे? भाजपकडून महिला नेतृत्वावर शिक्कामोर्तब! पाहा ह्या आहेत शर्यतीत!

 विश्वजीत भालेराव

पुणे:  Pune MahanagarPalika पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १६५ जागांपैकी तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. या स्पष्ट बहुमतामुळे आता पुणेकरांचे लक्ष एका प्रश्नाकडे केंद्रित झाले आहे.ते म्हणजेPune MahanagarPalika

पुण्याचा पुढचा महापौर कोण ?

आज मुंबईत जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार पुणे महानगरपालिकेचे महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्याच्या इतिहासात पुढील महापौर महिला असणार, हे आता निश्चित झाले आहे.Pune MahanagarPalika

ज्या पुण्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या पुण्याचा कारभार आता पुन्हा एकदा ‘सावित्रीच्या लेकी’कडे जाणार, अशी भावना शहरात व्यक्त होत आहे.Pune MahanagarPalika



या निवडणुकीत भाजपने महिलांना विशेष प्राधान्य दिले होते. तब्बल ९२ महिलांना उमेदवारी देत भाजपने ‘लाडकी बहीण’ संकल्पनेला राजकीय अधिष्ठान दिले. निकालानंतर भाजपच्या ५० पेक्षा अधिक महिला नगरसेविका निवडून आल्या, आणि त्यांच्यातीलच एक महिला आता महापौरपदाची सूत्रे हाती घेणार आहे.

महापौरपदाच्या शर्यतीत कोण?

सध्या महापौरपदासाठी काही नावे चर्चेत आहेत.

* रंजना टिळेकर — विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री, पाच वेळा निवडून आलेल्या अनुभवी नगरसेविका.

* मानसी देशपांडे — विजयाची हॅट्रिक करणाऱ्या, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक.

* मंजुषा नागपुरे — यंदा बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका.

* वर्षा तापकीर — खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी.

* रोहिणी चिमटे — संघटनात्मक अनुभव असलेले नाव.

‘सरप्राईज पॅकेट’ची शक्यता कायम

मात्र भाजपची परंपरा पाहता ऐनवेळी ‘सरप्राईज पॅकेट’ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदाच्या निवडणुकीत भाजपने यंग ब्रिगेड कार्ड प्रभावीपणे वापरले असून, हाच ट्रेंड पुढे नेला तर काही नवी नावेही पुढे येऊ शकतात.

दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचे नाव यंग लीडर म्हणून चर्चेत आहे. त्याचबरोबर पुण्यासारख्या आंतरराष्ट्रीय शहरात उच्चशिक्षित, तरुण महिला म्हणून प्रथमच नगरसेविका झालेल्या निवेदिता एकबोटे यांचे नावही महापौरपदासाठी पुढे येऊ शकते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे निवेदिता एकबोटे यांच्याकडेही विशेष लक्ष वेधले जात आहे.

पुणेकरांची उत्सुकता शिगेला

महिला नेतृत्व, अनुभव विरुद्ध नव्या चेहऱ्यांची लढाई आणि भाजपची रणनीती — या सगळ्यांमुळे “पुण्याचा पुढचा महापौर कोण?” हा प्रश्न शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे.सावित्रीबाईंच्या पुण्याचा कारभार नेमका कोणत्या ‘सावित्रीच्या लेकी’कडे जाणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Will Pune’s reins pass into the hands of ‘Savitribai’s daughters’? BJP stamps its authority on women’s leadership — here are the frontrunners!

महत्वाच्या बातम्या