Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Bhagat Singh Koshyari
मुंबई

Bhagat Singh Koshyari : पद्मभूषणवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांनाच भाजप सन्मानित करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Raju Patil
मुंबई

Raju Patil : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, मनसे नेते राजू पाटील यांची भाजपवर टीका

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणापासून आपले नगरसेवक वाचवण्यासाठी आणि पक्ष टिकवण्यासाठीच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला,” असे स्पष्ट करत मनसेचे नेते राजू पाटील यांनी भाजपवर ‘कपटी मित्र’ अशी टीका केली आहे.

मुंबई

Navnath Ban : औरंगजेब किंवा अफजल खान यांचा उदो-उदो चालणार नाही, नवनाथ बन यांचा इशारा

महाराष्ट्र कुणीही हिरवा करु शकत नाही. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला त्याने महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला, अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला त्याने प्रयत्न केला, पण हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा महाराष्ट्र आहे, असे कितीही औरंगजेबाचे फॅन आले तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही, इथे औरंगजेब किंवा अफजल खान यांचा उदो-उदो चालणार नाही, इथे केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकारच चालेल हे जलील यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिला आहे.

River front
पुणे

River front : नदी सुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे; फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार उद्घाटन!

बहुप्रतिक्षित अशा मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा, संगमवाडी येथील नदीवरील पुलापासून बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंतचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे संगमवाडी येथील नदीकाठचा जॉगिंग ट्रॅक वापरासाठी खुला केला जाणार आहे. या भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गाकडून या ट्रॅकचा वापर सुरू करण्यात आला आहे. सकाळी आणि संध्याकाळी याचा वापर फिरण्यासाठी केला जात आ

मुंबई

Anjali Damania : भुजबळ पूर्णपणे दोषमुक्त नाहीत; कलिना राज्य ग्रंथालय प्रकरण अद्याप प्रलंबित, अंजली दमानिया यांचा दावा

Anjali Damania राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहारप्रकरणात पूर्णपणे दोषमुक्त झालेले नाहीत. भुजबळ यांच्याविरोधातील कलिना राज्य ग्रंथालय बांधकाम गैरव्यवहाराचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असून, त्याबाबत विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Pune Civic Body
पुणे

Pune Civic Body : पुणे महापालिकेची पहिली विशेष सभा ६ फेब्रुवारीला महापौर व उपमहापौर निवडीसाठी होणार बैठक

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभागृहाची पहिली विशेष सभा ६ फेब्रुवारी २०२६, (शुक्रवारी) रोजी होणार असून, या सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता ही विशेष सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Imtiaz Jaleel
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel : संपुर्ण राज्यात हिरवा रंग करणार आहोत, इम्तियाज जलील यांचा किरीट सोमय्या यांना इशारा

मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख हिच्या बचावासाठी एआयएमआयचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील मैदानात उतरले आहेत. सहरने केलेल्या विधानाला मी पाठिंबा देतो असे म्हणत येणाऱ्या काळात आम्ही संपुर्ण राज्यात हिरवा रंग करणार आहोत. किरीट सोमय्यांना मी थेट आव्हान देतो. भाजपाची सत्ता आहे काही करू असे वाटत असेल तर, सोमय्या पुन्हा मुंब्र्यात आले तर त्यांचे व्हिडीओ चौकात दाखवेन.” असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.

Nitesh Rane
महाराष्ट्र

Nitesh Rane : सिंधुदुर्गात मतदानापूर्वीच महायुतीचा ‘धडाका’, नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात ११ उमेदवार बिनविरोध

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी आपली राजकीय पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच मोठा धमाका केला असून, जिल्ह्यातील एकूण ११ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये ५ जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती जागांचा समावेश असून, या विजयाने कोकणच्या राजकारणात ‘राणे’च धुरंधर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

महाराष्ट्र

Gulabrao Patil : बिहारींवर कशाला टीका करता? म्हणत मराठी तरुणांवर गुलाबराव पाटील यांचा निशाणा

आपल्या तरुणांकडे आता नोकरी करण्याची मानसिकता उरली नाही. बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो. पण आपण बिहारींवर टीका करतो. कशाला टीका करता? आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही हे सत्य आहे. तरुणांना माझ्या बोलण्याचा राग आला तर आला. आता 4 वर्षांनी निवडणुका आहेत. तेव्हा पाहू, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Elgar Parishad
मुंबई

Elgar Parishad : एल्गार परिषदप्रकरणी दोघांना जामीन मंजूर

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात आरोपी असलेल्या सागर गोरखे आणि रमेश गायकवाड या कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने समतेच्या आधारावर जामीन मंजूर केला. या प्रकरणातील इतर आरोपींनाही यापूर्वी अशाच प्रकारचा दिलासा देण्यात आल्याची नोंद न्यायालयाने घेतली.

Sahar Sheikh
महाराष्ट्र

Sahar Sheikh : “मुंब्रा को हरा कर देना है ” वक्तव्यावर सहर शेखचा माफीनामा; पोलिस चौकशीअंती प्रकरण दप्तरी

ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एआयएमआयएमच्या नगरसेविका सहर युनूस शेख (Sahar Sheikh) यांनी केलेल्या “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पूरा हरा कर देना है” या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

Eknath Shinde'
मुंबई

Eknath Shinde’ : म्हणूनच तीन वर्षे ‘तारीख पे तारीख’! एकनाथ शिंदेंच्या पोस्टवर संजय राऊतांचा जोरदार हल्ला

शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सतत होणाऱ्या सुनावणीच्या पुढे ढकलण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. मुंबई विमानतळावर सरन्यायाधीशांचे स्वागत करतानाचे फोटो शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर राऊत संतापले.