Nilanga : निलंगा येथे काँग्रेस उमेदवाराची पोलीस बंदोबस्तात नाट्यमय माघार
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या अंजना सुनील चौधरी यांच्या कथित अपहरणाची तक्रार २५ जानेवारी रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून पोलिसांत दाखल करण्यात आली होती. या प्रकरणामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू होती.











