विशेष प्रतिनिधी
लातूर : Nilanga लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या अंजना सुनील चौधरी यांच्या कथित अपहरणाची तक्रार २५ जानेवारी रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून पोलिसांत दाखल करण्यात आली होती. या प्रकरणामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू होती.Nilanga
मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अंजना चौधरी या पोलिस बंदोबस्तात निलंगा येथील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजर झाल्या. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेतला. या घडामोडीमुळे काँग्रेस गोटात मोठी खळबळ उडाली आहे.Nilanga
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि अॅड. किरण जाधव यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून उमेदवाराचा शोध घेऊन त्यांना समोर हजर करण्याची मागणी केली होती. मात्र दोन दिवसांनीच उमेदवार स्वतः पोलिस बंदोबस्तात हजर होऊन अर्ज माघारी घेतल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
तांबाळा गटात ‘भाजप विरुद्ध भाजप’ लढत?
तांबाळा गटातून भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून महानंदा तुमकुटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र भाजपकडूनच मीरा तुबाकले यांनीही अर्ज दाखल केला होता. काँग्रेस उमेदवाराने अचानक माघार घेतली असली, तरी तुबाकले यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही.
यामुळे आता तांबाळा गटात भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध भाजपकडूनच पर्यायी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारामध्ये थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून, हा सामना मतदारांसाठीही उत्सुकतेचा ठरणार आहे.
Nilanga: Congress Candidate Makes Dramatic Withdrawal Under Police Protection
महत्वाच्या बातम्या
- Pune Crime : मैत्रिणी सोबत बिनसलं, लोणावळ्यात गोळीबार अन् आरोपी BMW मधून फरार!
- Pune Airport पुणे विमानतळाची ऐतिहासिक कामगिरी; ACI ASQ सर्वेक्षणात सलग दोन तिमाहींमध्ये प्रथम क्रमांक
- पुणे हादरले! आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद; ५५ तोळे सोने, ८३० ग्रॅम चांदी हस्तगत!
- वाघोलीत आईकडून अकरा वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून, मुलीवरही प्राणघातक हल्ला