Gadchiroli : नक्षलवादाविरोधात लढणाऱ्यांचा सन्मान, गडचिरोली पोलिस दलाच्या 31 अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Gadchiroli नक्षलप्रभावित आणि अतिदुर्गम भागात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या गडचिरोली पोलिस दलाच्या 31 अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. देशभरात जाहीर झालेल्या एकूण 121 शौर्य पदकांपैकी 31 पदके एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील जवानांना मिळाल्याने राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.Gadchiroli

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांतील कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले.Gadchiroli

गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. जिल्ह्याच्या सीमावर्ती आणि जंगलांनी वेढलेल्या भागात पोलिस दल सतत नक्षलवाद्यांच्या धोक्याखाली कार्यरत असते. अशा कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या जवानांचे मनोबल या पुरस्कारामुळे निश्चितच उंचावले आहे. जंगलातील चकमकी, दुर्गम भागातील शोध मोहिमा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाऱ्या कारवायांमध्ये गडचिरोली पोलिस दलाने वेळोवेळी धाडस दाखवले आहे. याच शौर्याची आणि समर्पित सेवेची दखल घेत केंद्र सरकारकडून हे सन्मान जाहीर करण्यात आले आहेत.Gadchiroli



22 एप्रिल 2018 हा दिवस गडचिरोली पोलिस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. भामरागड तालुक्यातील बोरीया–कसनासूर या घनदाट जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या एका मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत गडचिरोली पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना ठार करत ऐतिहासिक यश मिळवले होते. नक्षलवादाविरोधातील आतापर्यंतच्या कारवायांमधील ही सर्वात मोठी आणि निर्णायक कारवाई मानली जाते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि प्रचंड जोखमीच्या परिस्थितीत ही मोहीम यशस्वी करण्यात आली होती.

या धाडसी कारवाईत प्रत्यक्ष शौर्य गाजवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी असलेले पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, विलास पोरतेट, संतोष नैताम यांच्यासह एकूण 31 जवानांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे. या सन्मानामुळे नक्षलविरोधी लढ्यात सहभागी असलेल्या प्रत्येक जवानाचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून, त्यांच्या कार्याला देशपातळीवर मान्यता मिळाली आहे.

President’s Police Gallantry Medals Awarded To 31 Gadchiroli Police Officers For Anti-Naxal Operations

महत्वाच्या बातम्या