विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आमदार रोहित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. “आधी स्वतःची पात्रता तपासा आणि जिभेला लगाम लावा. अन्यथा ‘मिठू, मिठू’ बोलणाऱ्यांचं काय होतं, याचा अनुभव तुम्हाला आहे,” असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला.Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, “तीन वेळा आमदार आणि पाच वर्षे मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास करू न शकणाऱ्या विजय शिवतारे यांना शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्याची राजकीय पात्रता आहे का, हे आधी तपासावे. श्रीक्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पात घोषणा करून ३५० कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देत निधी देणारे अजित पवारच होते, हे त्यांना बहुधा विसर पडलेला दिसतो.”Rohit Pawar
तीनदा आमदारकी आणि पाच वर्षे मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास करू न शकणाऱ्या आमदार विजय शिवतारे यांनी आदरणीय पवार साहेब आणि अजितदादा यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का, हे आधी तपासावं. श्रीक्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पात घोषणा करून ३५० कोटीच्या विकास आराखड्यास…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 25, 2026
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय सभा सुरू असताना, एका कार्यक्रमात विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी शिवतारे यांच्यावर निशाणा साधला.
“टीका करताना जिभेला लगाम हवा. पोपटासारखं ‘मिठू, मिठू’ बोलणाऱ्यांचं पुढे काय होतं, याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच. आजची त्यांची टीका ही त्यांच्या नाकर्तेपणाचीच कबुली आहे. ज्या पक्षाने आमदारकी आणि मंत्रीपद दिलं, त्याच पक्षाशी त्यांनी दगाफटका केला. अशांकडून आणखी काय अपेक्षा ठेवायच्या?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विजय शिवतारे यांनी यापूर्वी शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहूनही पुरंदरच्या खंडोबा मंदिरासह स्थानिक विकासाकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली होती. या वक्तव्यावरूनच आता राज्यातील राजकारण तापले असून, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
Rohit Pawar Warns Vijay Shivtare, Says “Check Your Credibility And Mind Your Tongue”
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर
- Raju Patil : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, मनसे नेते राजू पाटील यांची भाजपवर टीका
- Navnath Ban : औरंगजेब किंवा अफजल खान यांचा उदो-उदो चालणार नाही, नवनाथ बन यांचा इशारा
- River front : नदी सुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे; फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार उद्घाटन!