विशेष प्रतिनिधी
सातारा : Eknath Shinde लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देण्याचा शब्द पाळणार आहे. मी बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत ‘एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.Eknath Shinde
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देण्याचा शब्द पाळणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मी बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत ‘एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता’, असा डायलॉगही शिंदेनी मारला.Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले, पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता, 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्यवेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत. पुढे ते म्हणाले, अडीच वर्षात माझे काम तुम्ही पाहिले आहे. मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहीणींनी ठरवले होते, लाडक्या भावाला निवडून आणायचे, असे म्हणत त्यांनी 2100 रुपये योग्य वेळी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिम्मत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. तसेच, माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली असल्याचे शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले.
शिंदे म्हणाले, माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्म भूमी सातारा आहे, सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय. संपत्ती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली हे मी पाहिले. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हते. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कराव लागते, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या स्थगित्या उठवल्या, कोकण ते पश्चिचम महाराष्ट्र जवळ आणण्याचे काम सुरु झाले. साडेतीन वर्षे झाले आम्ही उठाव केला, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला शिवसेनाच या भूमीचा आणि लेकरांचा विचार आणि प्रगती करू शकते. गेला तो चोर आणि कचरा असे किती दिवस बोलणार? आमच्या सोबत ते का आले? याचा विचार करा, असा सल्लाही ठाकरेंना दिला.
₹2,100 for ‘Beloved Sisters’: Eknath Shinde Says, “I Do What I Promise”
महत्वाच्या बातम्या
- कोणताही रंग कुणाच्या बापाचा नाही, सयाजी शिंदे यांची मुंब्रा हिरवा करण्यावर संतप्त प्रतिक्रिया
- भाजपने परवानगी दिली तर शिंदे गटाचे नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईक यांचा इशारा
- ‘आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?’ महिला कर्मचाऱ्याचा गिरीश महाजनांना थेट सवाल!
- आता महाराष्ट्र थांबणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास