विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Civic Body पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभागृहाची पहिली विशेष सभा ६ फेब्रुवारी २०२६, (शुक्रवारी) रोजी होणार असून, या सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता ही विशेष सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.Pune Civic Body
निवडणूक प्रक्रियेसाठी सभेच्या अध्यक्षस्थानी कोण अधिकारी पिठासीन राहणार, यासह तारीख आणि वेळ निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार झालेल्या चर्चेनंतर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.Pune Civic Body
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन काही काळ लोटल्यानंतर आता प्रत्यक्ष सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू होणार आहे. महापौर आणि उपमहापौरांची निवड ही महापालिकेच्या कारभाराची दिशा ठरवणारी महत्त्वाची घटना मानली जाते. त्यामुळे या पहिल्याच विशेष सभेकडे शहरवासीयांचे, तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीनंतरचे राजकीय समीकरण, पक्षीय बलाबल आणि आघाड्यांची गणिते या सभेत स्पष्ट होणार आहेत.Pune Civic Body
महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्तांशी चर्चा करून सभेची तारीख आणि वेळ निश्चित केली असून, त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी म्हणून कोण नियुक्ती केली जाणार, याबाबतही अधिकृत आदेश येण्याची प्रतीक्षा आहे. नियमानुसार या पहिल्या विशेष सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवड गुप्त मतदान पद्धतीने होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात यंदा महिलांचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात असून, तब्बल ९१ महिला नगरसेविका सभागृहात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे यंदा महापौरपद महिला उमेदवाराकडे गेले आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनुसार महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, अनेक इच्छुकांची नावे पुढे येत असून, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
महापौर आणि उपमहापौर निवडीनंतरच स्थायी समिती, विषय समित्या तसेच विविध सभापतीपदांची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ६ फेब्रुवारीची सभा ही संपूर्ण महापालिकेच्या आगामी कारभाराचा पाया घालणारी ठरणार आहे. महापौरपदाचा मान मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून पक्षांतर्गत लॉबिंग, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पहिली विशेष सभा शांततेत आणि नियमानुसार पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात येणार आहे. सभेच्या दिवशी सुरक्षा व्यवस्था, सभागृहातील बैठक व्यवस्था, तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शहरासमोर सध्या पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, प्रदूषण, रस्त्यांची अवस्था, कचरा व्यवस्थापन आणि वाढते नागरीकरण अशा अनेक गंभीर समस्या आहेत. नव्या महापौर आणि उपमहापौरांकडून या प्रश्नांवर ठोस भूमिका आणि वेगवान निर्णयांची अपेक्षा पुणेकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे केवळ पदांची निवड नव्हे, तर पुढील पाच वर्षांच्या विकासाचा दिशादर्शक ठरणारी ही सभा असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या पहिल्या विशेष सभेत कोणाची वर्णी लागते, कोणते राजकीय समीकरण प्रत्यक्षात येते आणि पुणे महापालिकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जातात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Pune Civic Body to Hold First Special Meeting on February 6; Mayor and Deputy Mayor Election on Agenda
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष; ईडी मनी लॉन्डरिंग केसला पूर्णविराम
- गुजरातच्या दारूबंदीच्या धर्तीवर गुटखा बंदीसाठी स्वतंत्र कायदा, नरहरी झिरवाळ यांची माहिती
- उध्दव ठाकरे यांच्या शिवसैनिकाला महापाैरपदासाठी पाठिंबा द्या, भास्कर जाधव यांचे एकनाथ शिंदे यांना आवाहन
- महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर ; महिनाअखेरीस सत्तास्थापना