BMC : मुंबई महापालिकेत मराठी टक्का ठाकरेंचाच! भाजपचे मराठी 52, गुजराती 19 , युपीवाले 13

विशेष प्रतिनिधी

मुंबई : BMC मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता राजकीय समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. महानगरपालिका निवडणुकीत मराठी अस्मितेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मात्र निकाल पाहता, पालिकेच्या 227 जागांपैकी 147 जागांवर मराठी नगरसेवक निवडून आले असले, तरी सत्तास्थापन करणाऱ्या पक्षांमध्ये अमराठी प्रतिनिधींचे संख्याबळ लक्षणीय असल्याचे स्पष्ट झाले आहे.BMC

मराठी नगरसेवकांच्या संख्येत सर्वाधिक वाटा हा शिवसेना ठाकरे गटाचा आहे. ठाकरे गटाचे एकूण 58 मराठी नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपचे 52 मराठी नगरसेवक विजयी झाले असून, पक्षाच्या एकूण 89 जागांपैकी तब्बल 37 नगरसेवक अमराठी आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या असून त्यातीलही काही नगरसेवक हे अमराठी आहेत.BMC



 

या निवडणुकीत भाजपने 89 तर शिवसेना शिंदे गटाने 29 जागा जिंकत महायुतीला बहुमत मिळवून दिले. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या गटाला एकत्रित 71 जागांवर समाधान मानावे लागले, त्यात शिवसेना ठाकरे ठाकरे गटाच्या 65 आणि मनसेच्या 6 जागांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत लढलेल्या काँग्रेसला 24 जागा मिळाल्या, तर इतर पक्षांच्या खात्यात 14 जागा जमा झाल्या.

भाजपच्या 89 पैकी 37, काँग्रेसचे 18 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 7 नगरसेवक अमराठी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे निवडून आलेले तिन्ही नगरसेवकही अमराठी आहेत. एकूण आकडेवारी पाहता, प्रत्येक100 नगरसेवकांमागे सुमारे 30 नगरसेवक हे इतर भाषिक असल्याचे चित्र आहे.

एमआयएमचे या निवडणुकीत आठ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र त्यापैकी केवळ एकच नगरसेवक मराठी आहे. प्रभाग क्रमांक 140 मधून निवडून आलेले विजय उबाळे हे एमआयएमकडील एकमेव मराठी नगरसेवक आहेत.

या निवडणुकीत गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लीम समाजातील नगरसेवकांची संख्याही मोठी आहे. मुंबईत 21 गुजराती आणि 17 उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आले आहेत. मुस्लीम समाजाचे एकूण 31 नगरसेवक विजयी झाले असून, त्यातील 14 नगरसेवक काँग्रेसकडून आहेत.

Thackeray Camp Dominates Marathi Representation in BMC; BJP Has 52 Marathi, 19 Gujarati, 13 UP-Origin Members

महत्वाच्या बातम्या