विशेष प्रतिनिधी
मुंबई: Akshay Kumar बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या सुरक्षेसाठी असलेली कार मुंबईत अपघातग्रस्त झाली. या अपघातात ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही भरधाव एसयुव्ही एका ऑटोरिक्षाला जाऊन धडकली. त्यानंतर हा अपघात घडला. रिक्षाचा चक्काचूर झाला असून अक्षय कुमारची एसयुव्ही जागेवरच उलटली. रिक्षाचालक देखील जखमी.Akshay Kumar
परदेशातून प्रवास करून पत्नी ट्विंकल खन्ना यांच्यासह जुहू येथील घरी परतत असताना हा अपघात घडल्याचे समजते. घटनेनंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
या घटनेनंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, अद्याप अभिनेत्याची अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे.
Akshay Kumar’s Security Car Meets With Accident In Mumbai
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : काेल्हापुरातही शिंदेसेनेचा महापाैरपदावर डाेळा, काॅंग्रेससाेबत एकत्र येण्याची तयारी?
- डाॅ. संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी
- Shiv Sena : शिवसेना काेणाची, धनुष्यबाण काेणाच्या हातात: बुधवारपासून सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
- महापौर पदाच्या आरक्षणाची साेडत 22 जानेवारीला