Amol Mitkari : आगामी सर्व निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर घ्या, पराभवानंतर अमोल मिटकरी यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Amol Mitkari महापालिका निवडणुकीत पानिपत’ झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी सर्व निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर घेण्याची मागणी केली आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे मिटकरी म्हणाले.Amol Mitkari

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पराभवावर आश्चर्य व्यक्त करताना मिटकरी म्हणाले, “दोन्ही शहरांत प्रचंड काम करूनही आमचा पराभव कसा होऊ शकतो? ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो, हा मोठा प्रश्न आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल, तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घ्यावाच लागेल.”Amol Mitkari



दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “ही बैठक दैनंदिन प्रक्रियेचा भाग होती. कुटुंब म्हणून पवार कुटुंब नेहमीच एक आहे, मात्र राजकीय एकत्रिकरणाचा निर्णय हा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हेच घेतील.”

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांत भाजपला सर्वाधिक यश मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ अहिल्यानगरमध्ये चांगले यश प्राप्त झाले. मात्र, त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

“Hold All Future Elections on Ballot Paper,” Amol Mitkari Demands After Defeat

महत्वाच्या बातम्या