Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे किंगमेकर

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Eknath Shinde  छत्रपती संभाजीनगर महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. 25 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्ष (भाजपा) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ एमआयएम आहे. राज्याच्या सत्तेत सोबत असलेले मात्र महापालिकेत एकमेकांविरोधात लढलेली शिदेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. मात्र त्यांच्याशिवाय भाजपला महापौर करता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे किंगमेकर ठरणार आहेत.Eknath Shinde

निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत माजी महापौर रशिद खान उर्फ रशिद मामू यांना दिलेल्या प्रवेशामुळे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. यामुळे शिवसेनेच्या प्रचारात एकसूत्रता दिसून आली नाही. निवडणूक झाल्यानंतर खैरेंनी दानवेंवर गंभीर आरोप केले. दरम्यान, दानवेंचे बंधू पराभूत झाले तर खैरेंचे पुतणे विजयी झाले. दुसरीकडे शिंदेच्या आमदारांची मुले, मुली आता पालिकेच्या सभागृहात दिसणार आहेत. एमआयएमला प्रचारात मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले असले तरी पालिका निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही शहरातील आपले स्थान कायम ठेवले आहे.Eknath Shinde



छत्रपती संभाजीनगरमधील 115 जागांसाठी 859 उमेदवार रिंगणात होते गुरुवारी झालेल्या मतदानात 59.82 टक्के मतदान झाले. भाजप 58, शिवसेना (शिंदे) 12, शिवसेना (ठाकरे) 6, काँग्रेसचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला. तर एमआयएमचे उमेदवार 33 जागांवर विजयी झाले आहेत. भाजप आणि एमआयएम यांच्यातच काँटेकी टक्कर पाहायला मिळाली.

छत्रपती संभाजीनगर निकाल – 115
भाजप – 57
एमआयएम – 33
शिवसेना (शिंदे) – 13
शिवसेना (ठाकरे) – 06
वंचित बहुजन आघाडी – 04
काँग्रेस – 01
राष्ट्रवादी (शप)- 01
राष्ट्रवादी (अप) – 00

Eknath Shinde Emerges as Kingmaker in Chhatrapati Sambhajinagar

महत्वाच्या बातम्या