Rohit Pawar : मतमोजणीपूर्वीच रोहित पवार यांचे निवडणूक आयोगावर खापर

विशेष प्रतिनिधी

पुणे : Rohit Pawar मतमोजणीपूर्वीच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर खापर फोडायला सुरुवात केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य निवडणूक आयोग हा दात काढलेल्या वाघासारखा असल्याची टीका केली आहे.Rohit Pawar

रोहित पवार यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. त्यात भाजपने निवडणूक आयोगरुपी वाघाचे दात काढल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत सुरू असलेल्या अनागोंदीची गंभीर दखल घ्यावी. अन्यथा आज मतदानाची शाई पुसली जात आहे, तशी उद्या लोकशाहीही पुसली जाईल, असे म्हटले आहे.Rohit Pawar



महापालिकेच्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे. आधी मतदान यंत्रणेत बिघाड, नंतर बोटाला लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करायला देखील विलंब केला जात आहे. अनेक केंद्रांमध्ये तर EVM क्रमवारीनुसार लावलेले नाहीत तर दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टारचं चिन्हही नाही… एकूणच काय तर मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचं काम खुद् निवडणूक आयोगाकडूनच होतंय. अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी दर दोन तासांनी जाहीर केली जात नाही.. त्याऐवजी सायंकाळी एकत्रच ही टक्केवारी वाढवून बोगस मतदारांसाठी सोय करण्याचा तर हा प्रकार नाही ना? निवडणूक आयोगाने या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन ठराविक वेळेनंतर आकडेवारी जाहीर करावी अन्यथा आज मतदानाची शाई जशी पुसली जातेय तसं उद्या लोकशाही पुसली जाऊ नये, याची भीती वाटते, असे ते म्हणाले.

Rohit Pawar Blames Election Commission Even Before Vote Counting

महत्वाच्या बातम्या