Namdeo Dhasal : व्हिडिओ कॉलवर संवाद साधत देवेंद्र फडणवीस यांचा नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका यांना आधार

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Namdeo Dhasal सुप्रसिद्ध कवी, लेखक, दलित चळवळीतील कार्यकर्ते स्व.पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नाव शाहीर अमर शेख यांच्या कन्या मल्लिका नामदेव ढसाळ या सध्या आजारी आहेत. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही, नानाजी देशमुख प्रतिष्ठानतर्फे त्यांना मदत केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी व्हीडिओ कॉलवर संवाद साधला आहे.Namdeo Dhasal

देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस केली असता मल्लिका ढसाळ म्हणाल्या, प्रकृती काही बरी नाही. नामदेवच्याच मार्गाने जाणार असे वाटते. त्यावर फडणवीस म्हणाले, नाही नाही तुम्हाला काही होऊ देणार नाही. आम्ही सगळे आहोत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका आणि आम्ही सगळे तुमची नीट काळजी घेऊ. तुम्ही कशाचीही चिंता करू नका. नामदेवरावांचे अजून खूप काम बाकी आहे, ते तुम्हाला पुढे न्यायचे आहे.



मल्लिका ढसाळ म्हणाल्या, दुःख एवढेच आहे की ज्यांनी नामदेव सारखा झंजावात जन्माला घातला, त्याच्या नावावर इतके लोक दुकान थाटून बसले आहेत आणि त्याचे फायदे घेतात. पण नामदेव ढसाळांचे कुटुंब कसे राहते, ते जगत आहेत की मरतायत, याचे कोणालाही देणे पडले नाही, याची खंत वाटते. त्याने जे केले ते त्याचे कर्तव्य होते. आम्ही असे म्हणत नाही की त्याने जे केले त्याचे आम्हाला रिटर्न्स पाहिजेत, पण माणुसकी म्हणून तरी त्यांनी बघायला पाहिजे आम्हाला, असे दुःख मल्लिका ढसाळ यांनी व्यक्त केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही याचे अजिबात दुःख वाटून घेऊ नका. मी स्वतः लक्ष देणार आहे. आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत. मी स्वतः पर्सनली लक्ष घालत आहे. तुम्ही बिलकुल काळजी करण्याचे कारण नाही. नामदेव ढसाळ असो किंवा तुम्ही असाल, तुमच्या कुटुंबाचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे कोण काय करत आहे, हे विसरून जा आणि आम्ही तुमच्या सोब

https://youtu.be/GxaX5CmuKiY?si=PTSIvU5Im2-7XX1H

Devendra Fadnavis Offers Support to Namdeo Dhasal’s Wife Mallika Through Video Call

महत्वाच्या बातम्या