Naresh Arora : अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर छापा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Naresh Arora उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सुरुवातीला मोठी खळबळ उडाली होती. मात्र ही कोणतीही अधिकृत पोलिस कारवाई नसल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.Naresh Arora

पोलिसांच्या या पथकाकडून कार्यालयातील कागदपत्रांची केवळ प्राथमिक पाहणी केली जात असल्याची माहिती समोर येत असली तरी, नरेश अरोरा यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.Naresh Arora

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सुरुवातीला मोठी खळबळ उडाली होती. मात्र ही कोणतीही अधिकृत पोलिस कारवाई नसल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पोलिसांच्या या पथकाकडून कार्यालयातील कागदपत्रांची केवळ प्राथमिक पाहणी केली जात असल्याची माहिती समोर येत असली तरी, नरेश अरोरा यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणाबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.Naresh Arora

या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नैरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे. या संपूर्ण विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयम, जबाबदारी आणि स्पष्टतेसह आपली भूमिका मांडत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत म्हटले की, नरेश अरोड़ा आणि त्यांची संस्था ‘डिझाइनबॉक्स’ यांच्या पुणे कार्यालयाबाबत अनावश्यक तर्क-वितर्क पसरवले जात आहेत. वास्तविकता अशी आहे की संबंधित यंत्रणांनी नियमित प्रक्रियेअंतर्गत माहिती घेतली असून पूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब समोर आलेली नाही. या विषयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नरेश अरोड़ा आणि त्यांच्या संस्थेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास असून, निष्कर्ष केवळ तथ्यांच्या आधारेच काढले गेले पाहिजेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विकास पासलकर यांनी नरेश अरोरा यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभे असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी काम करणारे नरेश आरोरा आणि त्यांची डिझाईन बॉक्स कंपनी, आज त्यांच्या कंपनीत क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. ही कुठल्याही प्रकारे रेड किंवा एफआयआर हे दाखल झालेले नाही. प्रक्रियेचा भाग असल्यामुळे भेट देण्यात आली होती. त्यांना सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ‘डिझाईन बॉक्स’ कार्यालयात दिलेल्या भेटीनंतर नरेश अरोरा यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने आमच्या कार्यालयात येऊन कामकाजाची माहिती घेतली. प्रामुख्याने कार्यालयात नेमके काय काम चालते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम कशा प्रकारे हाताळले जाते, यावर त्यांनी चौकशी केली. पोलिसांकडे काही तक्रार प्राप्त झाली होती, त्या पार्श्वभूमीवर हे अधिकारी आले होते. ज्या नंबरवरून तक्रार आली होती, त्या नंबरवर आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सध्या लागत नाहीये. तसेच, जे अधिकारी तपासासाठी आले होते, त्यांचाही फोन आता लागत नाहीये.

Raid at Office of Ajit Pawar’s Political Advisor Naresh Arora”

महत्वाच्या बातम्या