Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले, अदानीशी दोस्ती बघणार नाही, तितका मी अडाणी नाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray  मुंबईवर किंवा महाराष्ट्रावर जेव्हा संकट येईल तेव्हा हा राज ठाकरे दोस्ती बघणार नाही, अदानीशी तर अजिबात नाही, तितका मी अडाणी नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.Raj Thackeray

ठाणे येथे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे म्हणाले, आजची सभा ही ठाण्याची आहे. उद्या सायंकाळी सगळा प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून पैसे वाटायला सुरू होईल. भाजपचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेंचे लोक पकडत आहेत. मी कल्याण डोंबिवलीला गेलो अनेक मतदारसंघात फिरलो. मला पैसे घेणाऱ्यांची चिंता आहे, घेणाऱ्यांची नाही. आपण या पैसे घेऊन आपल्या मुलामुलींना काय शिकवणार? महाराष्ट्रात 66 ठिकाणी पैसे देऊन फॉर्म माघार घ्यायला लावले.Raj Thackeray



एबी फॉर्म गिळण्यापर्यंत गेले, सोलापूरमध्ये आमच्या माणसाचा खून झाला. इथपर्यंत सरकार चालले आहे, पोलिस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. काय चालू आहे? 5 हजारांना मत विकली जात आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक यांना किती पैशांची ऑफर झाली असेल, तब्बल 15 कोटींची ऑफर देण्यात आली होती. मी त्यांना बोलवणार होतो, पण ते त्यांच्या प्रचारात आहेत. हे या 15 कोटीला विकले गेले नाहीत. दुसरे आहेत एक राजश्री नाईक, यांना 5 कोटींची ऑफर झाली होती, त्यांनी ती नाकारली. सुशील आउटे यांना एक कोटींची ऑफर झाली, नाकारली. अजून खूप लोक आहेत. कुठून येत आहे हा पैसा? महाराष्ट्रभर पैसा वाटला जात आहे.

राज ठाकरे म्हणाले, मी अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनधास्त जे हवे ते करत आहेत. पोलिसांत जाऊन उपयोग नाही, कोर्टात जाऊन उपयोग नाही. बदलापूरला आमच्या लोकांनी लैंगिक अत्याचाराचे प्रकरण बाहेर काढले. त्यातल्या आरोपीला मारून टाकले. काही गुपित होते का? त्यातला सहआरोपी जो होता, आपटे नावाचा, त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले. हिंमत कशी होते यांची? आमच्या अविनाश जाधवांनी धमकी दिल्यानंतर त्याने माघार घेतली. ही हिंमत येते कुठून पण? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकणारे हेच, देवेंद्र फडणवीस. या माणसाला काय झाले आहे काही समजतच नाही. तो माणूस कोणीतरी रसमालाई येऊन सांगतो मुंबई महाराष्ट्राची नाही आणि हे फडणवीस म्हणतात तो असा काही बोललाच नाही. आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावत आहेत. काल मी त्या अदानीचे प्रकरण बाहेर काढले, काय मिरच्या झोंबल्या. मग माझा आणि अदानीचा फोटो बाहेर काढला. माझ्या घरी सगळे येऊन गेले, घरी येऊन गेले म्हणून त्यांची पाप झाकायची का मी? मी जे दाखवले ते इतकी भीषण आहे. जेव्हा या मुंबईवर, महाराष्ट्रावर संकट येईल, तेव्हा राज ठाकरे दोस्ती बघणार नाही आणि अदानीशी दोस्ती करायचा संबंधच नाही, मी इतका अडाणी नाही.

उद्या गौतम अदानीने वीज बंद केली तर आपण सगळे अंधारात, तक्रार कोणाकडे करणार? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले, मी तुम्हाला सांगतो, इंडिगो विमानांवर संकट आले होते, त्याने स्ट्राइक केला होता. देश ठप्प. विचार करा, अदानीच्या हातात सीमेंट आहे, विमानतळ आहे, पोर्ट्स आहेत, लोखंडाचे व्यापार, या देशात तुमचे भवितव्य कोण ठरवणार गौतम अदानी. गेल्या 10 वर्षात हा माणूस मोठा झाला, ते कोणामुळे? या देशातले सगळे उद्योगपती मोठे व्हावेत, केवळ एकच मोठा होऊ नये, याला माझा विरोध आहे. उद्योग आल्यानंतर रोजगार निर्माण होतो. मी उद्योगपतीच्या विरोधातला माणूस नाही. या माणसाला पुढे करत सतत डाव साधायचे. आपली मराठी शहरे, याच्यावरचा मराठी ठसा यांना पुसायचा आहे.

आमच्या स्वाभिमानाला नख लावण्याचे काम या सरकारचे सुरू आहे. मुंबई विमानतळ विकत घेतले तेव्हा तिथे काय केले? विमानतळात तिथल्या कर्मचाऱ्यांनी गर्भा खेळला. यातून काय सांगायचे आहे यांना? मुंबईच्या विमानतळावर गर्भा केला. गणपतीमधला ढोल वाजवला का? वाजवायचे असेल तर ढोल लेझिमच वाजवावे लागतील. आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही. घोडबंदरला नॅशनल पार्कमध्ये जंगलाची जमीन त्याची एक हजार जमीन एका उद्योजकाला विकत आहेत. मला गणेश नाईकांनी सांगितले की हे होऊ देणार नाही, मला चांगले वाटले. हे कोणाला करायचे आहे एकनाथ शिंदेला करायचे आहे. हे सगळे गुजरातला न्यायचा यांचा डाव आहे.

ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे. ठाण्यात अनेक प्रश्न आहेत. आम्ही सगळे काही देणार आहोत, पण तुम्ही टिकलात तर. मला आत्ता कळत आहे की उंबरठ्यावर संकट आलेले आहे. आह गाफील राहिलात, कायमचे फसाल. या महानगरपालिका पण त्यांच्याकडे गेल्या तर तुम्ही कोणाकडे जाणार? आज ही वेळ आहे, पहिले स्वाभिमान, पहिले मराठी अस्मिता, हे सगळे तुमच्या हातात आहे.

Raj Thackeray said, I will not be friends with Adani, I am not that naive

महत्वाच्या बातम्या