विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis खोटं बोल पण रेटून बोल हीच तुमची पद्धत आहे. त्याचा पर्दाफाश करायला आम्ही आलो आहोत. तुम्ही माझ्या आई-वडिलांपर्यंत पोहोचलात. त्यांच्या विषयी बोललात. याची शरम वाटली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कानपिचक्या दिल्या.Fadnavis
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जाहीर सभेत फडणवीसांनी ठाकरे यांना थेट आव्हान देत राजकीय वातावरण तापवले.Fadnavis
फडणवीस म्हणाले, “शेजाऱ्याचं पोरगं मांडीवर बसवायचं आणि आमचंच पोरगं असल्याचं सांगायचं, हा तुमचा खेळ आहे. विकासावर बोलायचं असेल तर त्यासाठी धाडस लागतं. कुणात मर्दानगी आहे की नाही, हे बोलणारा मी नाही, ते माझे संस्कार नाहीत. पण तुम्ही माझ्या आई-वडिलांपर्यंत पोहोचलात. त्यांच्या विषयी बोललात. याची शरम वाटली पाहिजे.”Fadnavis
यानंतर आपल्या कुटुंबीयांचा उल्लेख करत फडणवीसांनी भावनिक प्रतिपादन केले. “मला अभिमान आहे की मी त्या बापाचा मुलगा आहे, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता. मी त्या बापाचा मुलगा आहे, ज्याने आणीबाणीच्या काळात दोन वर्षे तुरुंगवास भोगला. ज्याने संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवलं, कधी संपत्ती कमावली नाही. माझा बाप आज स्वर्गातून मला पाहात असेल, तर त्यालाही अभिमान वाटत असेल की माझ्या मुलाने हिंदुत्वाची वाट सोडली नाही,” असे फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर अधिक तीव्र टीका करत ते पुढे म्हणाले, “तुमचे वडील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गातून पाहात असतील, तर त्यांना काय वाटत असेल? माझा मुलगा आज कोणासोबत बसतोय, हे पाहून त्यांना काय वाटत असेल? तुम्ही कितीही खोटं बोललात तरी जनतेचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही.”
मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या चर्चेवरही फडणवीसांनी टोला लगावला. “महापौर कोण होणार याची चर्चा कुणी सुरू केली? आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार. देवेंद्र फडणवीस हिंदू आहे की नाही, हे तपासून बघा. डोकं, बर्थ सर्टिफिकेट सगळं पाहा. आम्ही अस्सल मराठी बोलणारे हिंदू आहोत,” असे सांगत त्यांनी सभेत उपस्थित कार्यकर्त्यांकडून जोरदार टाळ्यांची दाद मिळवली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच रंगत असून, येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
“You Dragged My Parents Into Politics, You Should Be Ashamed”: Fadnavis Takes a Swipe at Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन