विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kishori Pednekar शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयाने ऐकण्यास नकार दिला. निवडणूकीच्या तीन दिवस आधी याचिका करण्यात आल्याने त्यावनर तातडीने सुनावणी घेणे शक्य नसल्याचे न्यायालयाने याचिका ऐकण्यास नकार देताना नूद केले.Kishori Pednekar
न्यायालयाच्या या निर्णयामुळे पेडणेकरांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी पेडणेकरांच्या उमेदवारी अर्जाला उच्च न्यायालयात वकील कल्पेश जोशी यांच्यामार्फत आव्हान दिले होते. त्यायाचिकेवर मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी याचिकेवर तातडीच्या सुमावणीची मागणी केली.Kishori Pednekar
निवडणूक गुरुवारी होणार असल्याकडे लक्ष वेधून न्यायालयाने याचिकेवरील तातडीच्या सुनावणीला नकार देऊन सुनावणी तहकूब केली. किशोरी पेडणेकर या आगामी महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग १९९ (मध्य मुंबई) च्या नगरसेवक पदाच्या रिंगणात उभ्या आहेत. मात्र, पेडणेकर यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती उघड न केल्यामुळे, त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बेकायदेशीर, अवैध घोषित करून फेटाळण्याची मागणी शहा यांनी केली होती. याचिकेनुसार, करोना काळातील कथित फसवणुकीच्या प्रकरणात पेडणेकर यांचा समावेश आहे. तायसोबतच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध पाच गुन्ह्यांची माहिती पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात हेतुपुरस्सर दडपल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
Relief for Kishori Pednekar as High Court Refuses to Hear Plea Alleging Suppression of Facts
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन