विशेष प्रतिनिधी
बुलढाणा: Manoj Jarange जे समाजाच्या विरोधात गेले होते, जे आरक्षणाच्या विरोधात गेले, नेमके तेच आता निवडणुकीत उभे आहेत. त्यांना मतदान करू नका, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केले आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांनी आता कट्टर आणि कडवट वागले पाहिजे. मुस्लिम दलितांची या सरकारने काडी लावून टाकली. या सरकारचा कार्यक्रम करा. इतकी खुन्नस ठेवायची की यांना मतदान करायचे नाही. आम्ही कसे लोकसभेला एवढा फेस काढला होता. निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप होत नाही, तर यांनी पैसे वाटलेच आहेत. खूप माल आहे यांच्याकडे. यांच्याकडे आधी काय होते? आता खूप पैशांचे बंडल आहेत वाटते. शर्टामधून दिसतील असे बंडल हे सोबत ठेवतात. नोटा वाटतात आणि घोळ करतात. या महापालिकेत कोणासोबत कोणाची युती हेच कळत नाही.Manoj Jarange
यांचे राष्ट्रवादीसोबत जमते, भाजप शिवसेनेसोबत जमते, काँग्रेससोबतही युती आहे. हे सर्व भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना सगळे एकत्र आले आहेत. म्हणजे याचे शत्रू कोण तर आम्हीच ना, गोरगरीब जनता? आपल्या पक्षाचा नेता निवडून आला पाहिजे मग युती कुणासोबतही करा असा या लोकांचा अजेंडा आहे. लोक येडे आहेत, यांना पर्याय नाहीत. लोकांना एखादा पर्याय मिळू द्या, मग बघा जनता यांना कसे उलटेपालटे करते. जिल्हा परिषदा, नगरपालिका अशा स्थानिक लेव्हलच्या निवडणुकीत मी पडतच नाही, आपल्याला असा टप्पू मासा लागतो, त्याला जर माज असेल तर तो माज मी उतरवलाच म्हणून समजा असेही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
“Don’t Vote for Those Who Opposed Reservation,” Manoj Jarange Appeals to Voters
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis : आई-वडिलांपर्यंत पोहोचलात याची शरम वाटली पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांच्या उद्धव ठाकरेंना कानपिचक्या
- ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार: राघवेंद्र बाप्पू मानकर
- प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांवर फोकस; ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांचा विशेष महिला जाहीरनामा
- Chandrashekhar Bawankule : त्यांची पार्टी किंचित – किंचीत होत चाललीय, चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा