Devendra Fadnavis : मातोश्रीचे दार मी नाही तर त्यांनीच बंद केले, देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंवर पलटवार

विशेष प्रतिनिधी

पुणे : Devendra Fadnavis मातोश्रीचे दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावे की, ते दार मी नाही तर त्यांनीच बंद केले होते. मी वारंवार फोन करत होतो, पण त्यांनी फोन घेण्याचेही सौजन्य दाखवले नाही,” असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.Devendra Fadnavis

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुणे येथे बोलत होते. २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींवर बोलताना फडणवीस म्हणाले, “आम्ही पाच वर्षे सोबत होतो, एकत्र निवडणूक लढलो. तरीही तुम्हाला जर फारकत घ्यायची होती, तर किमान ‘देवेंद्रजी, माझे आता तुमच्यासोबत जमणार नाही’ असे सांगण्याची माणुसकी तरी दाखवायला हवी होती. मी फोन करत होतो, पण ते फोनवर बोलायला तयार नव्हते. याचे साक्षीदार स्वतः एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर आहेत.”Devendra Fadnavis



मातोश्रीची बदनामी थांबवा, या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, “इतक्या वर्षात मी मातोश्रीची कोणती बदनामी केली. मी बोललेलं एक स्टेटमेंट दाखवा. मी विरोधी पक्षनेता असताना आदित्य ठाकरेंवर मला विचारलं गेलं. मी एकमेव विरोओधी पक्षनेता होतो, मी म्हटलं मला असं वाटत नाही. त्यामुळे मी कधीही बिलो द बेल्ट आरोप करत नाही.”

फडणवीस पुढे म्हणाले, “मी त्यांच्यावर आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्याविरोधात माझ्या पत्नीविरोधात खालच्या स्तरावर जाऊन बदनाम केले. आमच्याबद्दल अश्लील लिहिले. पुरावे आहेत. तरीही मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.”
“उद्धव ठाकरे आता म्हणतात की दारे उघडी आहेत, पण आता मला कोणत्याही दरवाजाची लालसा उरलेली नाही. माझ्यासाठी आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे उघडले आहेत आणि तीच माझी ताकद आहे,” असे म्हणत फडणवीसांनी आता ‘मातोश्री’शी पुन्हा सख्य होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे.

या निवडणुकीमध्ये फक्त आमचे उमेदवार बिनविराेध निवडून आले हे म्हणणे चुकीचे आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही उमेदवार निवडून आलाय. अपक्षांची काय ताकद असते? पण तोही आला ना? किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने, उबाठाने, शरद पवारांनी उमेदवार दिला नाही. अपक्ष उमेदवार त्यांच्यापुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले,” असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली, आता त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही. आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत: आणून उभे करायचे का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

It was not me but them who closed the door of Matoshree, Devendra Fadnavis’ counterattack on Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या