विशेष प्रतिनिधी
मुंबई : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगेमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंत्र्यांच्या निवासस्थानासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे बेवारस वस्तू सापडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
ही बॅग नेमकी कुणाची आहे, ती तिथे कशा उद्देशाने ठेवण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपासानंतरच ही निष्काळजीपणा की घातपाताचा प्रयत्न, हे स्पष्ट होणार आहे.
पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संशयास्पद बॅगेची सध्या तज्ज्ञ पथकांकडून कसून तपासणी केली जात असून, यात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात ‘प्लीज टेक फ्री शूज अँड क्लोथ्स’ असे लिहिल्याचे आढळून आले.
या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस सर्व तांत्रिक बाबींची कसून चौकशी करत आहेत.
आमदार नितेश राणे यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका आणि त्यांना लाभलेली कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहता, त्यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे संशयास्पद वस्तू मिळणे ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे.
Suspicious Unattended Bag Found Outside Nitesh Rane’s ‘Suvarnagadh’ Residence in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन