Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Gautam Adani
महाराष्ट्र

Gautam Adani : गौतम अदानी म्हणाले , शरद पवार ‘माझे मेंटॉर

उद्योगजगतातील दिग्गज गौतम अदानी यांनी रविवारी शरद पवार यांचे उघडपणे कौतुक करत त्यांना आपले “मेंटॉर” असल्याचे सांगितले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शरद पवार यांची दूरदृष्टी, अनुभव, प्रशासनातील जाण आणि देशहिताचा व्यापक दृष्टिकोन आपल्याला सतत प्रेरणा देत आला असल्याचे अदानी यांनी स्पष्ट केले.

Mumbai Youth
मुंबई

Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विरोधात काँग्रेसने मुंबईतील लोकलमध्ये अनोखे आंदोलन करत पिढीतील न्याय देण्याची मागणी केली आहे

CM Eknath Shinde
मुंबई

CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिंदेंचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांनी प्रवेश केला आहे.

speak Marathi
मुंबई

Speak Marathi : मराठी बोलत नाही म्हणून सहा वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या

नवी मुंबईतील कळंबोली येथील एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या केली. महिलेला मुलगा हवा होता आणि मुलगी मराठीऐवजी हिंदी बोलत असल्याने ती नाराज होती, असे पोलिसांनी सांगितले.

BJP Sees
पुणे

BJP : भाजपमध्ये इनकमिंग सुरूच, अजित पवार गटालाही धक्का

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपमध्ये इनकमिंगचा सिलसिला सुरूच असून, माजी उपमहापौर दिलीप बराटे आणि माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच काँग्रेसलाही आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे. उमेदवारी निश्चितीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपकडून विविध पक्षांतील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांना पक्षात सामावून घेण्यावर भर दिला जात आहे.

Mahayuti Seat
पुणे

Mahayuti Seat : महायुतीत भाजप-शिवसेना शिंदे गट जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावरून पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेतील नाराजी उघडपणे समोर आली आहे. शिवसेनेने २५ जागांची मागणी केली आहे. परंतु भाजपकडून त्याला प्रतिसाद दिला जात नसल्याचे चित्र आहे.

Pimpri-Chinchwad
पुणे

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पती विरुद्ध पत्नी असा सामना रंगणार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांना भाजप-आरपीआय युतीकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच, त्यांच्या पत्नी प्रज्ञा वाव्हळकर यांनी पतीविरोधातच निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. “पती ज्या प्रभागातून उभे राहतील, तिथेच मी त्यांच्या समोर उभी ठाकणार,” अशी घोषणा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : ब्रँड-ब्रँड’ भाषा करणाऱ्यांचा जनता बँड वाजवणार, एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

जे केवळ ‘ब्रँड-ब्रँड’ अशी भाषा करत आहेत, त्यांचा महापालिका निवडणुकीत जनता बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर नाव न घेता बोचरी टीका केली. डोंबिवली पश्चिमेच्या सम्राट चौकात आयोजित विजय निर्धार सभेमध्ये ते बोलत होते.

Sharad Pawar
मुंबई

Sharad Pawar : शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

उपमुख्यमंत्रीअजित पवार सत्तेत आहेत, ते कुठे जाणार नाहीत. परंतु, शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात. त्यांना घ्यायचे की नाही हे भाजपने ठरवावे असा दावा बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधी–सोरोससदृश व्यक्तींची भेट, जर्मनी दौऱ्यावरून काँग्रेस पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींच्या परदेशातील भेटींवर विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. जर्मनी दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी जॉर्ज सोरोसशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधल्याच्या आरोपांवर प्रश्न विचारला असता पित्रोदांनी थेट, “आम्हाला काही फरक पडत नाही” असे विधान केले.

Fadnavis
मुंबई

Fadnavis : विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आणि त्यातून मते मिळवायची, हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसा नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाने केला आहे.