Surendra Pathare : बापूंच्या डबल गेममुळे सुरेंद्र पठारे अडचणीत, दोन्ही मुलांना सेट करण्याची खेळी अंगलट
विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे यश मिळून बापू पठारे वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार झाले. महापालिका निवडणुकीतही बापूंचा करिष्मा चालणार असे वाटत असताना दलबदलूपणाची परंपरा कायम ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कात्रजचा घाट दाखवत भाजपशी घरोबा करण्यास सुरुवात केली आहे. त्या बळावर दोन्ही मुलांना राजकारणात सेट करण्याची त्यांची खेळी चांगलीच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या डबल गेममुळे भाजपकडून लढण्याच्या तयारीत असलेले त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे चांगलेच अडचणीत आले आहेत.











