Aditya Thackeray : महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत, आदेश सूरत-अहमदाबादहून चालणार नाहीत, आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Aditya Thackeray   “कुटुंब आणि राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. आज महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची हीच भावना आहे. भाजप जे करत आहे, त्यात सर्व आदेश सूरत आणि अहमदाबादमधून येतात,” असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.Aditya Thackeray

झी २४ तासच्या ‘टू द पॉईंट’ या विशेष मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वरळीतील डोममध्ये झालेल्या कार्यक्रमात लोकांच्या डोळ्यांत आनंद आणि भावना दिसत होत्या. पुण्यातही लोक भेटले तेव्हा “महाराष्ट्रासाठी ठाकरे एकत्र यावेत” हीच भावना व्यक्त करत होते. जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच घडणार, आम्ही एकत्र राहण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी एकत्र आलो आहोत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.Aditya Thackeray



राज ठाकरे यांच्याकडे राजकीय नेते म्हणून कसे पाहता, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आधीही भेटी होत होत्या, पण गेल्या दोन महिन्यांतील भेटींमध्ये कुटुंब म्हणून एक वेगळी भावना आहे. आज एकत्र आलो ते कुटुंब म्हणून थोडं वेगळं आणि चांगलं वाटत आहे.”

लहानपणापासून राज ठाकरेंना आपण ‘राजाकाका’ म्हणत असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच भेटत असतो. मात्र लोक ज्या दृष्टीकोनातून पाहतात, त्यात राजकीय महत्त्व असते. दोन कुटुंबे आणि महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या दोन ताकदी एकत्र आल्याचा आनंद आहे.

आदित्य ठाकरे यांनी हेही नमूद केले की, ठाकरे बंधूंची २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेली युती महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणार आहे. “आम्ही पुढे काय करायचं यावर सातत्याने चर्चा करत आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

We are united for Maharashtra, orders will not be issued from Surat-Ahmedabad, asserts Aditya Thackeray

महत्वाच्या बातम्या