Chief Minister : मुंबई महापालिका सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chief Minister  आगामी महापालिका निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला.Chief Minister

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, मुंबईत कोणाला महापौर बनवायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आणणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. मुंबई ही कोणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा विषय नसून, मुंबईकरांसाठी चाललेली लढाई आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढायचं आहे, जिहादी मानसिकतेला ठेचण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे. निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नसून, विचारांची लढाई असल्याचा दावा केला.Chief Minister



, मुंबईतच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जन्म झाला. त्यामुळे अटलजींचं भव्य आणि योग्य स्मारक मुंबईत उभारलं जावं, ही आमची भूमिका आहे. कोणाला महापौर बनवायचं यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मुंबईकरांच्या विकासासाठी कोण काम करू शकतो, याचा विचार व्हायला हवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भावनिक मुद्द्यांपेक्षा कामगिरी महत्त्वाची ठरेल, असा दावा करत त्यांनी महायुतीच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त केला. मुंबईत सत्तेसाठी नव्हे, तर मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही लढत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही पक्षाला निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावं लागतं, तेच आज काही पक्ष करत आहेत. निवडणुकीसाठी दोन-चार पक्ष किंवा नेते सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचं काम पाहूनच मतदान करतील. विरोधकांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला असून, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं पाप केलं आहे. त्यामुळे मराठी जनता आता त्यांच्या सोबत उभी राहणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला असून, निवडणुका जवळ आल्या की भावनिक भाषणं केली जातात. मात्र आता जनता अशा भावनिक घोषणांना भुलणारी नसून, कामाच्या आधारे निर्णय घेणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर विचारधारांचा संघर्ष ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे

Mumbai Municipal Corporation is not a battle of power, but of ideas, Chief Minister attacks the opposition

महत्वाच्या बातम्या