विशेष प्रतिनिधी
पुणे : Surendra Pathare विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे यश मिळून बापू पठारे वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार झाले. महापालिका निवडणुकीतही बापूंचा करिष्मा चालणार असे वाटत असताना दलबदलूपणाची परंपरा कायम ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कात्रजचा घाट दाखवत भाजपशी घरोबा करण्यास सुरुवात केली आहे. त्या बळावर दोन्ही मुलांना राजकारणात सेट करण्याची त्यांची खेळी चांगलीच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या डबल गेममुळे भाजपकडून लढण्याच्या तयारीत असलेले त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे चांगलेच अडचणीत आले आहेत.Surendra Pathare
वडील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि एक मुलगा भाजपकडून तर दुसरा राष्ट्रवादीकडून लढण्याच्या तयारीत आहे. ही गेम लोकांच्या चांगलीच लक्षात आली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एका बाजूला संतप्त आहेत तर भाजपच्या निष्ठावानांना ही डबल गेम फारशी पचनी पडेनाय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रचंड नाराजीचा सामना पठारे यांना करावा लागतोय. घरचा मतदारसंघ थोरल्या मुलासाठी सोडून शिंदेंकडे भाजपच्या पुण्याईवर धाकट्या मुलाला खराडी सोडून विमाननगर मतदारसंघात उभे करून नगरसेवक करण्याची बापू पठारे यांची खेळी आहे. भाजपच्या सुजाण मतदाराच्या लक्षात ही गोष्ट आली आहे. त्यामुळे सुरेंद्र पठारे यांना विरोध वाढू लागला आहे. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते उघडपणे बोलत नसले तरी मतपेटीतून दणका देण्याच्या तयारीत आहेत. दुसऱ्या बाजूला खराडी मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याच घरात ठेवण्याची तयारीही लोकांच्या डोळ्यावर आली आहे.Surendra Pathare
बापू पठारे यांच्यासाठी पक्ष बदलणे नवीन नाही.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे बोट धरून ते राजकारणात आले. मात्र अडचणीच्या काळात त्यांची साथ सोडून राष्ट्रवादीत गेले. येथे स्थायी समिती, आमदारकी मिळविली. मात्र राष्ट्रवादी अडचणीत आल्याचे दिसल्यावर 2019 मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या विरोधात काम केले. मात्र लोकांनी त्यांचे ऐकले नाही. सुनील टिंगरे यांनाच निवडून दिले.
2024 च्या निवडणुकीत संधी दिसल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची साथ धरून उमेदवारी मिळविली. पोर्श कार अपघात प्रकरणात टिंगरे अडचणीत असल्याने निसटत्या मतांनी विजय मिळवून आमदार झाले. त्यांच्या विजयासाठी शरद पवारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. महापालिका निवडणुकीत त्याची उतराई होईल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा त्यांनी खेळी करत मुलगा सुरेंद्र पठारे यांना भाजपमध्ये पाठविले. भाजपच्या प्रभावशाली मतदारसंघातून सुरेंद्र पठारे यांना निवडून आणायचे आणि आपल्या घरच्या मतदारसंघात दुसऱ्या मुलाला उभे करायचे अशी डबल गेम करण्याच्या तयारीत ते आहेत. मात्र हा डबल गेम चालू द्यायचा नाही असे आता लोक म्हणू लागले आहेत.
Surendra Pathare in Trouble as Bapu’s Double Game Backfires, Bid to Settle Both Sons Goes Wrong
महत्वाच्या बातम्या
- सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या, हर्षवर्धन सपकाळ
- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटविण्याची मागणी
- बांगलादेशात युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर प्रचंड असंतोष, देशभर आंदोलन; ढाकामध्ये जाळपोळ
- विधानसभा निवडणुकीत आघाडीचा टांगा पलटला, आता महापालिकेत घोडेही फरार, एकनाथ शिंदेंचा टोला