Aditya Thackeray : उन्नाव बलात्कार प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद, आदित्य ठाकरेंचा संताप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Aditya Thackeray उत्तर प्रदेशातील बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य दोषी आणि माजी भाजप आमदार कुलदीपसिंह सेगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.Aditya Thackeray

सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित करताना सेगरने सात वर्षांहून अधिक काळ कारावास भोगल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले, मात्र या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या आईला आणि पीडितेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संताप अधिकच वाढला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी, भाजपचे माजी आमदार कुलदीप यांची शिक्षा स्थगित केल्याने जगभरात संतापाची लाट उसळली आहे.Aditya Thackeray



याशिवाय, बलात्कारी व्यक्तीविरुद्ध निषेध करणाऱ्या पीडितेला आणि तिच्या आईला पोलिसांनी केलेली मारहाण धक्कादायक आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने लाडकी बहीणसारख्या घोषणा दिल्या आणि योजना आखल्या. मात्र, आज पीडितेसोबत आणि आंदोलन करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसोबत काय घडत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, जगभरातील देश आणि लोक हे पाहतील, यावर बोलतील. परंतु भारतात आंदोलनकर्त्यांवरच हुकूमशाही पद्धतीने टीका होत असून मंत्री देखील या पीडितांच्या आंदोलनाची टिंगल करतात. आपण हेच करायला आलो आहोत का? बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या माणसाला सर्वात कठोर शिक्षा मिळायला हवी होती, पण त्याला जामीन का मिळाला? हा न्याय आहे का? हे मानवीय आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच, जोपर्यंत दोषींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सर्वांनी याबद्दल बोलणे पाहिजे, तसेच या घटनेचा निषेध करणे थांबवूच नये, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

Unnao rape case has repercussions in Maharashtra, Aditya Thackeray is angry

महत्वाच्या बातम्या