Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Thackeray brothers
मुंबई

Thackeray brothers : ठाकरे बंधूंच्या युतीने भाजप आणि शिंदे गटाला पोटशूळ, मनसेची टीका

शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत आले आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीने भाजप आणि शिंदे गटाला पोटशूळ उठला आहे, असा टोला मनसेने लगावला आहे.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : अचानक बडव्यांशी हातमिळवणी कशी केली? आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना सवाल

पक्ष वेगळा करताना तुम्हीच म्हणाला होतात की चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला आहे. हे चार कारकून कोण आहेत? या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा का? अचानक ही हातमिळवणी कशी केली?” असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री आशिष शेलार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला आहे.

Vijay Vadettiwar
मुंबई

Vijay Vadettiwar : मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू, विजय वडेट्टीवार यांचा आराेप

महाराष्ट्र, मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे असा आराेप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : काँग्रेसचा हात की ठाकरे बंधूंची साथ, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत संभ्रम

मुंबईमध्ये फारशी ताकद नसल्याने काेणाचा तरी आधार शाेधत असलेल्या शरद पवारांच्या (Sharad Pawar)  राष्ट्रवादी काॅंग्रेससमाेर ठाकरे गट आणि मनसेच्या युतीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. काॅंग्रेसचा हात हातात घ्यावा की ठाकरे बंधूंची साथ घ्यावी असा प्रश्न शरद पवार गटाला पडला आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : सच्चा जिता, हार गया झुठा, जनताने दिया उबाठा को दिया जमाल गोठा! एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नकली सब घर पर बैठे है, असली सब मेरे सामने बैठे है. सच्चा जिता, हार गया झुठा, जनताने दिया उबाठा को दिया जमाल गोठा, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Pratap Sarnaik
मुंबई

Pratap Sarnaik : मतदार यादीत शासकीय अधिकार्‍यांच्या मदतीने राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप, मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप

मिरा-भाईंदर महापालिकेच्या अंतिम प्रभाग मतदार यादीत शासकीय अधिकार्‍यांच्या मदतीने राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप केल्याचे आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेकडून नोव्हेंबर महिन्यात प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त हरकती व सूचनांची दखल घेत प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली. मात्र, प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या या अंतिम यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे आरोप होत आहेत.

Mumbai Municipal Corporation
मुंबई

Mumbai Municipal Corporation : शरद पवार गटाचा काँग्रेसला मुंबई महापालिकेत एकत्रित लढण्याचा प्रस्ताव

मुंबईमध्ये महाविकास आघाडीत फुट पडली आहे. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी एकत्रित लढावे असा प्रस्ताव शरद पवार गटाने काँग्रेस नेत्यांना दिला.

Chief Minister
पुणे

Chief Minister : पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

Thackeray group
मुंबई

Thackeray group : ठाकरे गट – मनसे युतीची अधिकृत घाेषणा बुधवारी हाेणार

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. आता बुधवारी (२४ डिसेंबर) याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

Rahul Gandhi
मुंबई

Rahul Gandhi : राहुल गांधींनीही झिडकारले, संजय राऊत म्हणाले काॅंग्रेसचा विषय संपला

काँग्रेस हा विषय नक्कीच संपलेला आहे. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की, कुठेही कटुता न येता मुंबई मनपा निवडणूक लढू, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे. जागावाटपाची आमची टीम आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Prithviraj Sutar
महाराष्ट्र

Prithviraj Sutar : कट्टर शिवसैनिकांनीही सोडली साथ, पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाला खिंडार

पुण्यातील शिवसेनेची ओळख असलेल्या सुतार कुटुंबानेही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar ) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Arvind Kejriwal,
देश-विदेश

Arvind Kejriwal, : आम आदमी पक्षाला देणग्यांचा ओघ तिपटीने वाढला; प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट ठरला प्रमुख दाता

आम आदमी पक्षाला (AAP) मिळणाऱ्या देणग्यांमध्ये एका वर्षात तब्बल तिपटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाकडे (EC) सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 11.06 कोटी रुपये देणग्या मिळालेल्या ‘आप’ला 2024-25 मध्ये तब्बल 38.1 कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत.