Thackeray group : ठाकरे गट – मनसे युतीची अधिकृत घाेषणा बुधवारी हाेणार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Thackeray group  मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. आता बुधवारी (२४ डिसेंबर) याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.Thackeray group

महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल लागल्यानंतर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहे. मनसे -ठाकरे शिवसेना जागावाटपगेल्या काही महिन्यांपासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकत्रित महापालिका निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू होती. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. दोन्ही पक्षांचे जागावाटपही झाल्याचे सांगण्यात आले. आज (२३ डिसेंबर) दोन्ही पक्षाच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार होती, पण ऐनवेळी ती पुढे ढकलण्यात आली आहे.Thackeray group



शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर करत ‘उद्या, १२ वाजता’, असे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मनसे-ठाकरे युतीची घोषणा नव्या मुहूर्तावर केली जाणार आहे. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात जागावाटप पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी काही जागांवरून तिढा कायम असल्याचे कळते. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मंगळवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जागावाटपाची प्रक्रिया अनावश्यक ताणून धरू नका. ती लांबवू नका, असे सांगितले होते. पण, तरीही जागांचा तिढा कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी युतीची घोषणा केली. मात्र, नवाब मलिक यांच्याकडे बोट दाखवत भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवले आहे. सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी ५० जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र, पक्षाने अद्याप याबद्दलचा निर्णय जाहीर केलेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसने स्वबळाचे दंड थोपटल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.

Thackeray group-MNS alliance to be officially announced on Wednesday

महत्वाच्या बातम्या