विशेष प्रतिनिधी
मुंबई: Mumbai Municipal Corporation मुंबईमध्ये महाविकास आघाडीत फुट पडली आहे. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी एकत्रित लढावे असा प्रस्ताव शरद पवार गटाने काँग्रेस नेत्यांना दिला.Mumbai Municipal Corporation
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस होता. 15 जानेवारी 2026 रोजी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.Mumbai Municipal Corporation
मुंबई महापालिकेत समविचारी पक्षांनी एकत्र लढावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेस नेत्यांना दिला. एकत्र लढलो तर फायदा होईल. मतांची विभागणी होणार नाही, हेच सांगण्यासाठी शरद पवार गटाचे एक शिष्टमंडळ आज काँग्रेस नेत्यांना भेटले. या बैठकीनंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एकत्र लढणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.Mumbai Municipal Corporation
राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला 50 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. आजची पहिल्या फेरीची चर्चा झाली असून उद्या (बुधवार) पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी रविवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केल्यानंतर काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्याकडून मुंबई महापालिकेत नवीन सहकाऱ्याचा शोध सुरु आहे. उद्याच्या बैठकीत काय निर्णय होते हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
राज्यातील 29 महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी केली आहे. आढावा बैठका व रणनीतीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता 40 स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनीक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अभिनेते व काँग्रेस नेते राज बब्बर, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार भाई जगताप, अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, एम.एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.
Sharad Pawar Faction Proposes Joint Fight With Congress in Mumbai Municipal Corporation Elections
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar : तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने अजित पवारांची खेळी, काँग्रेसशी हातमिळवणीचा प्रयत्न
- मुंढवा भूखंड घोटाळा, शितल तेजवानी यांच्या पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार यांच्या सह्या
- Rohit Pawar : धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसची भाजपला मदत, रोहित पवार यांचा बी-टीम म्हणत काँग्रेसवर निशाणा
- Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गट – मनसे युतीची घोषणा वाजत गाजत, संजय राऊत म्हणाले नाटक नसून प्रीतीसंगम