विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde नकली सब घर पर बैठे है, असली सब मेरे सामने बैठे है. सच्चा जिता, हार गया झुठा, जनताने दिया उबाठा को दिया जमाल गोठा, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.Eknath Shinde
नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूक 2025 मधील शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगराध्यक्षा तसेच नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार सोहळा मुंबईतील दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सत्काळ मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शेरोशायरीतून जोरदार टीका केली.Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले की, पोट दुखी-पोट दुखी, परंतु ही किती पोट दुखी. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर तुम्हाला पटत नाही. घटनाबाह्य घटनाबाह्य, पद जाणार, मुख्यमंत्रीपद जाणार, सरकार पडणार, पण अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदे याने काम केलं आहे. मला वाटतं त्या अडीच वर्षामध्ये मी अडीच तास तरी नीट झोपलो नसेल. मला लोकं विचारतात, तुम्ही कधी झोपता आणि कधी उठता. मी त्यांना सांगतो की, मी झोपायला नाही, तर लोकांच्या झोपा उडवायला आलो आहे. झोपलो तर कसं चालेल. कारण मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आपला कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. याठिकाणी कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. त्यामुळे माझी इच्छा असते की, एकनाथ शिंदे बनून तुम्ही काम केलं पाहिजे. शेवटी कार्यकर्ता हा पक्षाला मोठं करत असतो. एका-एका नगराध्यक्षाच्या आणि नगरसेवकाच्या पाठी आपले शेकडो व हजारो कार्यकर्ते आपल्या जीवाचं रान करत असतात. तसेच आपले कार्यकर्ते तहान भूक हरवून काम करतात, त्यामुळे त्यांच्याच जोरावर आमदार आणि खासदार मंत्री बनले आहेत. या व्यासपीठाची शोभा तुम्ही आहात. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास सोपा नाही, असे म्हणत शिंदेंनी कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, फेसबुक लाइव्ह करून पक्ष वाढू शकत नाही. घरात बसून शिवसेना वाढत नाही. मी जेव्हा फिरत होतो तेव्हा मला महाविकास आघाडी कुठे दिसलीच नाही. महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता. त्यांचे कार्यकर्ते सांगत होते, आले नाहीत, पण त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तरी सभा घ्यायला हवी होती. पण त्याही घेतल्या नाहीत. त्यामुळे कोण असली आणि कोण नकली हे जनतेने दाखवून दिले आहे. निवडणूक आयोगाने आणि न्यायालयाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. पण जनतेच्या न्यायालयाने दाखवलं, 70 पर्यंत आपण गेलो, तुमची आठवरच गाठ पडली. या निवडणुकीत आपण पाहिले की, महाविकास आघाडीच्या मतांची बेरीज जरी केली, तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्या पेक्षा जास्त आहे. हा विजय मिळाला आहे आणि हा इतिहास आहे. शिवसेना बाळासाहेबांच्या आणि आनंद दिघे यांच्या विचारांची आहे. महायुती आता पुन्हा या महापालिकेच्या निवडणुकीत भगवा फडकवेल, असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
“Truth Wins, Lies Lose”: Eknath Shinde Launches Scathing Attack on Uddhav Thackeray, Says People Rejected UBT
महत्वाच्या बातम्या
- New Zealand : भारत-न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करार; भारतात येणारे अर्ध्याहून अधिक सामान आता शुल्कमुक्त
- जैन कुंभमेळा णमोकार तीर्थक्षेत्रासाठी 36.35 कोटींचा सुधारित आराखडा मंजूर; फेब्रुवारी 2026 मध्ये कुंभमेळा
- इम्रान मसूद यांनी प्रियांका गांधींची सोंगटी पुढे ढकलली; त्याच दिवशी राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची “भविष्यवाणी” झाली!!
- Piyush Goyal : पीयूष गोयल म्हणाले, भारत कधीही आपले डेअरी सेक्टर उघडणार नाही; अमेरिकेशी व्यापार करार पुढच्या टप्प्यात