Thackeray brothers : ठाकरे बंधूंच्या युतीने भाजप आणि शिंदे गटाला पोटशूळ, मनसेची टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Thackeray brothers शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत आले आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीने भाजप आणि शिंदे गटाला पोटशूळ उठला आहे, असा टोला मनसेने लगावला आहे.Thackeray brothers

शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीनंतर लागलीच भारतीय जनता पक्षाकडून ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला मनसेने लागलीच उत्तर देत मुख्यमंत्री फडणवीस यांचा अल्ला हाफिज म्हणणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.Thackeray brothers



ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करताना ठाकरे बंधूंच्या युतीला मत म्हणजे मुस्लिम धार्जिन्यांना मत असा आरोप करण्यात येत आहे. यावर राज ठाकरे राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अल्ला हाफिज असे म्हटले आहेत. त्यामुळे त्यांनी या गोष्टी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत. ते काय बोलतात यावर माझे व्हिडीओ तयार असतील, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

राज ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिल्या बरोबर मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांचा अल्ला हाफीज म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तसेच भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे हे दर्ग्यावर चादर चढवतात असा आरोप केला, त्यालाही त्यांनी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा चादर चढवतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे. त्याबरोबरच विरोधकांकडून आरोप सुरु झाले. येत्या १५ जानेवारीला महापालिकांसाठी मतदान होईल आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील तोपर्यंत आरोप-प्रत्यारोपांच्या राळ उठताना पाहायला मिळणार आहे, त्याची सुरुवात आता झाली आहे.

Thackeray brothers’ alliance gives BJP and Shinde group a headache, MNS criticizes

महत्वाच्या बातम्या