विशेष प्रतिनिधी
पुणे: Pimpri-Chinchwad पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांना भाजप-आरपीआय युतीकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच, त्यांच्या पत्नी प्रज्ञा वाव्हळकर यांनी पतीविरोधातच निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. “पती ज्या प्रभागातून उभे राहतील, तिथेच मी त्यांच्या समोर उभी ठाकणार,” अशी घोषणा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.Pimpri-Chinchwad
प्रज्ञा वाव्हळकर यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका केली. “एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणारा भाजप, दुसरीकडे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला उमेदवारी कशी देऊ शकतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मला लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये नकोत, तर मला आणि माझ्या मुलीला संरक्षण हवे आहे,” अशी आर्त सादही त्यांनी यावेळी घातली.Pimpri-Chinchwad
आपल्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाचा पाढा वाचताना प्रज्ञा म्हणाल्या की, अद्याप घटस्फोट झालेला नसतानाही त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. मुलीच्या पालनपोषणासाठी पतीकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “जे स्वतःच्या कुटुंबाची आणि मुलाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत, ते लोकप्रतिनिधी म्हणून शहराचा कारभार कसा पाहणार?” असा बोचरा सवाल त्यांनी कुणाल वाव्हळकर यांच्या उमेदवारीवर केला आहे.
प्रज्ञा वाव्हळकर यांनी प्रभाग क्रमांक २५ किंवा २६ मधून कुणाल वाव्हळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने युतीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. पती-पत्नीमधील हा वाद आता थेट मतपेटीपर्यंत पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कौटुंबिक कलह आता राजकीय मैदानात आल्यामुळे मतदारांचा कल कोणाकडे असणार आणि भाजप या वादावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Husband Vs Wife Set To Clash In Pimpri-Chinchwad Political Battle
महत्वाच्या बातम्या
- विशिष्ट लोकांचे जोडे चाटून मते मिळविण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुण्यात आपचा एकला चलोचा नारा; १६५ पैकी १६४ जागांवर उमेदवार
- दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीमुळे नाराज प्रशांत जगताप यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश
- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राजकारणातील नैतिकता रसातळाला, भाजपाचा हल्लाबोल