Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Raghavendra Bappu Mankar
पुणे

Raghavendra Bappu Mankar : राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

पुण्यातील मध्यवस्तीचा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

MNS Triggers
मुंबई

MNS Triggers : मनसे सोबत युतीने ठाकरे गटात बंडाची लाट, ‘मातोश्री’ बाहेर घोषणाबाजी

नऊ वर्षांनंतर होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटामध्ये अभूतपूर्व बंडखोरी उफाळून आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी लालबाग, दादर, वरळी, परळ या भागांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनीच अधिकृत उमेदवारांविरोधात बंडाचा झेंडा उभारला. संतप्त कार्यकर्त्यांचे आंदोलन थेट मातोश्रीबाहेर पोहोचले.

Pune
पुणे

Pune : पुण्यात गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराचा सीन, चिल्लर आणून उमेदवाराने अधिकाऱ्यांनाच लावले कामाला

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात उमेदवार अनामत रक्कम भरण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचा सीन आहे. अगदी असाच प्रकार पुण्यात घडला. एक-दोन आणि दहा रुपयांचे नाणे घेऊन आलेल्या उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी अधिकाऱ्यांनाच कामाला लावले.

Pune Election
पुणे

Pune Election : पुण्यात भाजप – शिवसेना शिंदे गट युती तुटली, शिवसेना सर्व जागा लढवणार

पुण्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची युती अखेर तुटली आहे. शिवसेना शिंदे गट सर्व जागा लढवणार असल्याचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी जाहीर केले. Pune Election

Pune Civic Polls
पुणे

Pune Civic Polls : पुणे महापालिकेसाठी शिवसेना, काँग्रेस, मनसेसह समविचारी पक्ष सोबत ; काँग्रेस ६० जागा तर शिवसेना ४५ जागांवर एकमत

पुणे महापालिकेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि मनसेसह समविचारी पक्षांची महाविकास आघाडी अखेर पक्की झाली असून, पहिल्या टप्प्यातील जागावाटपावर दोन्ही प्रमुख पक्षांत एकमत झाले आहे. काँग्रेसला ६० तर शिवसेनेला ४५ जागा देण्याचा निर्णय अंतिम झाला असून, त्या जागांवरील उमेदवारांना संबंधित पक्षांकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. उर्वरित जागांचे वाटप अंतिम टप्प्यात असून, मंगळवारी सकाळपर्यंत सर्व जागावाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Dhangekar–Pawar
पुणे

Dhangekar–Pawar : धंगेकर-पवार भेटीमुळे शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सोमवारी भेट घेतल्याने शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील जिजाई या अजित पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले असले, तरी जागावाटपाच्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहिले जात आहे.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : तिकीट नाकारल्याने भाजपमध्ये असंतोष; अनेक माजी नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश

पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, त्याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला होताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस उरले असतानाच सहा माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Police keep
पुणे

Police keep : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर पोलिसांची नजर

‘महापालिका निवडणुका शांततेत पार पाडणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मका कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांकडून त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आतापर्यंत साडेपाच हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Mumbai
मुंबई

Mumbai : आपला दवाखाना ठरला मुंबईकर रुग्णांचा आधार, मुंबईसह राज्यभरात २५९ आपले दवाखाने कार्यरत

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी शिवसेनेने सुरु केलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधून लाखो रुग्णांनी उपचार घेतले. गोरगरिब रुग्णांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिवसेनेचा राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी यांनी व्यक्त केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

NCP
महाराष्ट्र

NCP : पूर्वपरवानगीशिवाय प्रचार, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिवाजी गदादे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

निवडणूक आचारसंहिता लागू असताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वाहनांवर राजकीय चिन्हे, स्पीकर आणि नेत्यांचे फोटो लावून प्रचार केल्याप्रकरणी पर्वती भागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भादंवि कलम २२३ तसेच लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ चे कलम १२७ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. NCP

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली असून दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ त्यांनी रविवारी फोडला आहे. शरद पवारांचे उमेदवार हे तुतारी या चिन्हावर तर अजित पवारांचे उमेदवार हे घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Pune MahanagarPalika
पुणे

Pune MahanagarPalika : आमदार–खासदारांचे नातेवाईकांना कट, भाजपची सुधारित यादी तयार, वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीनंतर घराणेशाहीला ब्रेक

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठा राजकीय फेरबदल झाला असून, आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यावर वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केल्यानंतर घराणेशाहीला चाप देत अनेक नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या, अशी थेट सूचना वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्यानंतर भाजपकडून सुधारित उमेदवार यादी तयार करण्यात आली आहे. प्रदेश भाजपच्या अंतिम मान्यतेनंतरच ही यादी जाहीर होणार आहे.