विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली असून दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ त्यांनी रविवारी फोडला आहे. शरद पवारांचे उमेदवार हे तुतारी या चिन्हावर तर अजित पवारांचे उमेदवार हे घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.Ajit Pawar
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला ज्यांनी कर्जात ढकलले ना बाजूला करायचे आहे. माझी केंद्रात ओळख असून प्रश्न सोडवता येणार आहेत. आपल्या विचारांचे काही खासदार आहे. त्यांच्याकडून काम करुन घायची आहेत. शेतकरी तुमची माझी जात आहे. दोन दिवस कळ काढा सगळे समजेल. भूलथपांना बळी पडू नका. काही लोकांची दहशत नेस्तनाबूत करायची आहे,” असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता भाजपचे महेश लांडगे यांच्यावर निशाणा साधला.Ajit Pawar
“कुदळवाडीमध्ये जमिनी बळकावण्यात आल्या. संत पीठात वारकरी घडवायचे होते, मात्र संत पिठात सीबीएससी शाळा सुरु केली. संत पिठात गीता रामायण शिकवण्यात येत नाही, संत पिठात कंपनी सुरू केली. संत पीठ हे फक्त नावापुरते राहिले आहे,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली.
\जे ठरले होते ते का थांबवण्यात आले? वेगळ्या पद्धतीचे राजकारण जे चालले आहे ते थांबवायला हवे. पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या 25 वर्षाच्या माझ्या राजकारणात मी कधी कर्ज काढले नव्हते. आज महापालिकेवर कर्ज झाला आहे. हे पाप कोणाचे? टँकर माफिया शहरात चालत आहे. मुठभर लोकांना पोसण्यासाठी तुम्ही लोकांना पाणी देत नाही. महापालिकेत रिंग चालली असून वारेमाप खर्च चालला आहे. जॅकवेल निविदा 30 टक्क्यांनी वाढवण्यात आली.” असे म्हणत त्यांनी नाव न घेता पुन्हा एकदा महेश लांडगे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच, ते म्हणाले की, “ही निवडणूक फार उशिरा आली. कार्यकर्ता जपला पाहिजे, त्याला मान दिला पाहिजे कारण आम्ही शिव- शाहू- फुले आंबेडकरांच्या विचारांनी काम करतो. मी खासदार झालो तेव्हा पी व्ही नरसिंगराव मंत्री होते. शेतकरी कुटुंबातील मी कार्यकर्ता आहे. शरद पवार तेव्हा चांगलं काम करत होते. मला खासदार केल्यावर हा शहरात विकास झाला पाहिजे असे वाटत होते.
Both NCP will fight together, Deputy Chief Minister Ajit Pawar announces
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत