विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai मुंबईकरांच्या आरोग्यासाठी शिवसेनेने सुरु केलेल्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामधून लाखो रुग्णांनी उपचार घेतले. गोरगरिब रुग्णांना चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणामुळेच मतदार शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा विश्वास शिवसेनेचा राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी यांनी व्यक्त केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.Mumbai
महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीला विजय मिळेल, असा विश्वास शायना एन. सी यांनी व्यक्त केला. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष दिवसागणिक मजबूत होत आहे. जनहिताच्या निर्णयांमुळे शिवसेनेवरील विश्वास वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आरोग्य सेवेचे महत्व सांगितले होते. मुंबईतील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गरिबांना उत्तम आरोग्य सेवेसाठी कार्यरत आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी ही योजना सुरु कऱण्यात आली होती, असे शायना एन.सी म्हणाल्या.Mumbai
आज राज्यभरात २५९ आपला दवाखाना कार्यरत आहेत. या दवाखान्यांमधून दर महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी उपचार घेतले. आतापर्यंत आपला दवाखानामधून १ कोटी ४१ लाख रुग्णांनी उपचार घेतले. हा उपक्रम गरिबांसाठी वरदान ठरत असून शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचा विचार आणखी भक्कम करत असल्याचे शायना एन.सी म्हणाल्या. विरोधी पक्ष केवळ आरोप करण्याचे काम करते. त्यांची समाजाशी नाळ तुटलेली आहे. त्यामुळेच नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली, अशी टीका शायना एन.सी यांनी केली. राज्यातील जनता शिवसेने सोबत आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे नगर परिषदांच्या निकालांची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये दिसेल, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला.
Aapla Davakhana has become a support for Mumbaikar patients, 259 of our clinics are operational across the state including Mumbai.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईसाठी अजित पवारांच्या 36 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
- Mumbai Youth : उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन
- CM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का, सख्खे भाचे आशिष माने राष्ट्रवादी अजित पवार गटात
- महायुतीत खदखद; रवींद्र धंगेकरांची नाराजी उघड, अपक्ष लढण्याच्या तयारीत