विशेष प्रतिनिधी
बीड: शिरूर मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या याने अनेक हरणांची शिकार केल्याचे समोर आले आहे. यावरून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केला आहे. हरिण मारल्यावर मटणाचा डबा आमदार धस यांच्या घरी जायचा असे ते म्हणाले.
शिरूर कासार येथील ढाकणे कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिरूर कासार येथे बंद पाळत मोर्चा काढण्यात आला . सतीश भोसलेला अटक करण्याची आणि एसआयटी चौकशी करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून केली जात आहे. आरोपीला वाचवण्यात आमदार सुरेश धस यांचा सहभाग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. यावेळी बोलताना हाके म्हणाले, तिथल्या माणसांनी मला सांगितलं, हरीण मारलं की हरणाचा एक डब्बा तयार करून आमदार सुरेश धस यांच्या घरी हा डबा जातो.
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, खोक्या भोसले हा हिमनगाचे टोक आहे. जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत आकाची व्याप्ती महाराष्ट्राला समजणार नाही. तो सुरेश धस यांच्यासाठी काम करतो, असं इथल्या जनतेचे मत आहे, याची निपक्षपाती चौकशी करावी आणि या माणसावर गुन्हे दाखल करावेत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
वन विभाग नक्की काय करत आहे, मेंढपाळाच्या चार मेंढ्या वनात गेल्या तर त्याला सोलून काढणार. मात्र इथे 200 हरणं मारली गेली, ते कोण बघणार. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
या भागामध्ये कालिकादेवी महाविद्यालयात आहे, या विद्यालयात शिक्षकांसमोर तिसरी चौथी पास झालेला हा गुन्हेगार, खोक्या भोसलेचं भाषण महाविद्यालयातील प्राचार्यांनी ठेवलं होतं. तिथे या खोक्याने लहान मुलांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यामुळे तिथल्या शिक्षकांवर आणि प्राचार्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची गृहविभागाला विनंती आहे. आज मोर्चात सहभागी झालेल्या सगळ्यांचे मी आभार मानतो, या आरोपीला कडक शासन झाल पाहिजे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
A tifin of mutton was found at Suresh Dhas’s house after killing a deer, alleges Laxman Hake
महत्वाच्या बातम्या
- चक्क बांग्लादेशीनी घेतला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ, किरीट सोमय्या यांनी दिले पुरावे
- पैशाची गुर्मी, नशेच्या आहारी गेलेले तरुण समाजकंटकासारखे वागताहेत, डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संताप
- माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांचा आत्महत्येचा प्रयत्न? अन्नातून विषबाधा झाल्याचा कुटुंबाचा दावा
- बड्या बापाच्या मद्यधुंद मुलाचे महिलांसमोर अश्लील वर्तन, महिला दिनीच प्रकाराने संताप