Chandrababu Naidu : भ्रष्टाचार संपवायचाय, ५०० रुपयांची नोट बंद करा, चंद्राबाबू नायडू यांचे मत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोठे मूल्य असलेल्या नोटा बंद व्हायला हव्यात. ५०० रुपयांची नोट बंद करायला पाहिजे, असे मत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले. Chandrababu Naidu

आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नायडू म्हणाले, “सर्व जास्त मूल्य असलेल्या नोटा बंद करायला हव्या. तेव्हाच भ्रष्टाचार संपवता येईल. १०० आणि २०० रुपयांपेक्षा कमी मूल असलेल्या नोटाच चलनामध्ये असल्या पाहिजे. ५०० रुपयाच्या नोटेची गरज नाही.



देशात गरीब-श्रीमंतामधील दरी वाढतेय सरकारच्या मोफत लाभाच्या योजनाबद्दल नायडू म्हणाले, “फ्रीबीज हा योग्य शब्द नाहीये. पूर्वी जास्त कल्याणकारी योजना नव्हत्या. पण, एनटीआर (माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव) यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. आज देशात संपत्ती तयार होत आहे. पण, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. कल्याणकारी योजना सार्थकी लागल्या पाहिजे आणि त्याचा लाभ प्रभावी पद्धतीने दिला गेला पाहिजे.

“प्रत्येक नागरिकाची जातिनिहाय जनगणना तर केलीच पाहिजे. त्याचसोबत कौशल्य आधारित आणि आर्थिक स्थितीबद्दलही जनगणना केली पाहिजे. आजच्या काळात माहिती खूप शक्तीशाली बनली आहे. त्यातून सार्वजनिक धोरणे अधिक चांगल्या प्रकारे लागू केली केली जाऊ शकतात, असेही नायडू म्हणाले.

Corruption should be ended, 500 rupee note should be banned, says Chandrababu Naidu

महत्वाच्या बातम्या