Saket Gokhale : तृणमुल खासदार साकेत गोखले यांच्या वेतनावर न्यायालयाची अटॅचमेंट!

Saket Gokhale : तृणमुल खासदार साकेत गोखले यांच्या वेतनावर न्यायालयाची अटॅचमेंट!

Saket Gokhale

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Saket Gokhale  तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांस खासदार म्हणून मिळणाऱ्या वेतनावर अटॅचमेंट लावण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. गोखले यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे माजी राजदूत लक्ष्मी पुरी यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणात ही कठोर कारवाई करण्यात आली.Saket Gokhale

न्यायमूर्ती मन्मीत प्रितम अरोरा यांच्या खंडपीठाने आदेश दिला की, गोखले यांचा पगार ५० लाख रुपये न्यायालयात जमा होईपर्यंत जप्त ठेवण्यात यावा. त्यांच्या पगाराची रक्कम सध्या सुमारे ₹१.९ लाख प्रति महिना आहे. भारतीय दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC) कलम ६०(i) नुसार, पगाराच्या दोन-तृतीयांशपर्यंत जप्ती शक्य असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले.

गोखले यांच्यावर २०२१ मध्ये झालेल्या एका वादग्रस्त ट्विटमुळे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. या ट्विटमध्ये त्यांनी लक्ष्मी पुरी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या स्वित्झर्लंडमधील मालमत्तेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही या ट्विटमध्ये टॅग करून ईडी चौकशीची मागणी केली होती.

जुलै २०२३ मध्ये न्यायालयाने या ट्विटला मानहानीकारक ठरवत गोखले यांना The Times of India मध्ये आणि त्यांच्या ट्विटर खात्यावर जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे ट्विटरवरील माफीचे ट्विट सहा महिने ‘पिन’ करून ठेवण्यास सांगण्यात आले होते.

मात्र, या आदेशाचे पालन न केल्याने डिसेंबर २०२३ मध्ये लक्ष्मी पुरी यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने गोखले यांना त्यांच्या मालमत्ता, बँक खाती आणि उत्पन्नाचा खुलासा करणारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते.

गेल्या आठवड्यात गोखले यांनी ex parte निर्णय मागे घेण्याची विनंती करणारी याचिका सादर केली होती, ज्यावर एका वेगळ्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे.

या प्रकरणात न्यायालयाने शेक्सपिअरच्या Othello नाटकाचा दाखला देत अब्रूनुकसानीचे गंभीर परिणाम अधोरेखित केले होते. आता गोखले यांना त्यांच्या पगारातूनच दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत न्यायालयाच्या जप्ती आदेशाचा सामना करावा लागणार आहे.

Court attaches salary of Trinamool MP Saket Gokhale!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023