विशेष प्रतिनिधी
पुणे : छावा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्के घराण्याच्या वंशजांनी ‘छावा’ चित्रपटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. छत्रपती संभाजी राजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आता पुन्हा वादात सापडला आहे . पुण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राजे शिर्के घराण्याच्या वंशजांनी ‘छावा’ चित्रपटा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलीय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शिर्के घराण्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना दोषी ठरवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दीपकराजे शिर्के यांनी सांगितले की, दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या काल्पनिक कादंबरीवर आधारित या चित्रपटात त्यांच्या घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली आहे . स्वराज्यात राजे शिर्के यांचे मोठे योगदान असून, मागील १३ पिढ्यांपासून छत्रपती घराण्याशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत.
शिर्के वंशजांनी माहिती अधिकारात शासनाकडे विचारणा केली असता, त्यांच्या घराण्याविरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी चुकीचा संदर्भदिल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
चित्रपट उत्कृष्ट असला तरी त्यातील खलनायकाचे चित्रण चुकीचे असल्याचे शिर्के वंशजांचे म्हणणे आहे. चुकीच्या इतिहासामुळे समाजात दूषित वातावरण निर्माण होते, म्हणून इतिहासावर योग्य संशोधन होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणी चित्रपट निर्माते आणि कादंबरी प्रकाशक यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांनी कान्होजी आणि गणोजी शिर्के या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्याच फितुरीमुळे संभाजी महाराजांनी कैद करणे औरंगजेबाच्या सैन्यांना शक्य होते.
महाराजांकडे केवळ 150 मावळे असतात. तर, दुसरीकडे औरंगजेब महाराजांना कैद करण्यासाठी तब्बल 5 हजारांचं सैन्य येत असतं. या लढाईत अंताजी, रायाजी असे सगळेजण आपले प्राण गमावतात. शेवटी कान्होजी आणि गणोजी शिर्के यांनी केलेल्या फितुरीमुळे शंभूराजेंना कैद करणं औरंगजेबाच्या सैन्याला शक्य होतं असा संपूर्ण प्रसंग दाखवण्यात आला आहे.
गणोजी शिर्के हे महाराणी येसूबाईंचे बंधू व छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते. याच गणोजींची भूमिका चित्रपटात सारंग साठ्ये साकारत आहे. कान्होजींच्या भूमिकेत सुव्रत जोशी आहे.
Defamation of Shirke family in Chhava movie: Allegation of descendants of Raje Shirke family
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, 12 मार्चला विधानसभेवर मोर्चाचा आमदार सतेज पाटील यांचा इशारा
- उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक धक्के, मी धक्का पुरुष झालोय
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी
- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा