विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Shashi Tharoor माझ्या सेवेची पक्षाला गरज नसेल तर माझ्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे, असा थेट इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशि थरूर यांनी दिला आहे.Shashi Tharoor
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळातील पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वातील एलडीएफ सरकारची प्रशंसा केल्यामुळे काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शशी थरूर यांनी थेट पक्षाचे नेतृत्वालाच इशारा दिला
इंडियन एक्सप्रेस मलयालम (IE Malayalam)च्या पॉड कास्टमध्ये बोलताना शशि थरूर यांनी हा इशारा दिला आहे. पक्ष सोडण्याच्या अफवांचं त्यांनी खंडनही केलं आहे. भलेही विचारांमध्ये मतभेद असतील, पण काँग्रेस सोडण्याच्या बाबत आम्ही विचार करू शकत नाही, असे ते म्हणाले.
शशि थरूर यांनी केरळ सरकारच्या धोरणांचं कौतुक केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली त्याचेही थरूर यांनी कौतुक केलं आहे. थरूर यांनी केरळच्या पार्टीच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतरही पक्षाच्या मुखपत्रातून थरूर यांच्यावर टोले लगावण्यात आले होते. विरोधकांचं तुम्ही कौतुक का केलं? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी राजकीय नेता म्हणून विचार करत नाही. माझे विचार इतकेही संकुचित नाहीयेत, असं थरूर यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसने नवीन मतदारांना पक्षासोबत जोडावं आणि केरळमध्ये आपले मतदार वाढवले पाहिजेत, असे आवाहन थरूर यांनी केलं. केरळ राज्यात पक्षाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे, या माझ्या मताशी काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी समर्थन दिलं आहे, विविध एजन्सीचे सर्व्हेही पक्षाचं राज्यातील नेतृत्व बदलावं असंच सांगत असल्याचे थरूर म्हणाले.
काँग्रेसने केरळमध्ये आपला व्होटर बेस वाढवला नाही तर तिसऱ्यांदा विरोधी पक्षात बसावं लागेल, अशी भीती थरूर यांनी व्यक्त केली आहे.
I have another option available, Shashi Tharoor’s direct warning to Congress
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…