Shashi Tharoor : भारत आता ‘दुसरा गाल’ पुढे करणार नाही, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पाकिस्तानला सुनावले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल आणि देश आता ‘दुसरा गाल’ पुढे करणार नाही, असे काँग्रेस खासदार शशी थरूर Shashi Tharoor पाकिस्तानला सुनावले आहे.

भारतातील दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तान असून त्यांच्याविरोधात भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या लष्करी कारवाईनंतर भारताची बाजू प्रमुख जागतिक स्तरावर मांडण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळे गेली आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली पनामामध्ये शिष्टमंडळ गेले आहे. रिपब्लिक ऑफ पनामाचे राष्ट्रपती जोस राऊल मुलिनो यांची त्यांनी भेट घेतली.

थरूर म्हणाले, महात्मा गांधी स्वातंत्र्यलढ्याचे अतिशय खंबीरपणे नेतृत्व करताना, आपण नेहमीच आपल्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे, अशी शिकवण दिली. आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो त्यांच्या रक्षणासाठी आपण नेहमीच सजग असले पाहिजे. कसलीही भीती मनात ठेवता जगले पाहिजे. जगात ज्यांची ओळख दहशतवादी अशी आहे, त्या दुष्ट लोकांचे हल्ले परतवून लावत आपल्याला भीतीपासून मुक्तता मिळवायची आहे, असे सांगून थरूर म्हणाले, Shashi Tharoor

आमच्या देशात येऊन दहशतवादी कृत्य करू, निष्पाप लोकांना मारून पळून जाऊ आणि यातून काही मोठे राजकीय किंवा धार्मिक उद्दिष्ट साध्य करू, असा उद्देश या दहशतवाद्यांचा आहे. पण कोणतेही स्वाभिमानी राष्ट्र हे स्वीकारणार नाही. असे घडत असेल महात्मा गांधींची भूमी असलेला भारत देशही दुसरा गाल पुढे करणार नाही. उलट, आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देऊ.

India will not turn the ‘other cheek’ now, Congress MP Shashi Tharoor tells Pakistan

महत्वाच्या बातम्या