J.P. Nadda : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलली देशाची राजकीय संस्कृती, जे.पी. नड्डा यांनी केले अकरा वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: ११ वर्षांपूर्वी देशात तुष्टीकरणाचे राजकारण होते. समाजात फूट पाडून खुर्ची वाचवण्याचे राजकारण होत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणाची व्याख्या बदलली. आजच्या काळात आम्ही ‘परफॉर्मन्सचं राजकारण’, ‘उत्तरदायित्वाचं राजकारण’ आणि ‘रिपोर्ट कार्डचं राजकारण’ करत आहोत,” असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा असल्याचे सांगितले. J.P. Nadda

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारने ११ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने नड्डा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. देशाच्या आर्थिक विकासात, सामाजिक कल्याणाच्या योजनांमध्ये आणि जागतिक पातळीवरील भारताच्या नेतृत्वात झालेली प्रगती अधोरेखित करताना ते म्हणाले “मोदी आहेत म्हणून शक्य आहे.” J.P. Nadda



नड्डा म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात विकास, संशोधन आणि नवप्रवर्तन या तीन क्षेत्रांमध्ये विशेष भर देण्यात आला. गेल्या ११ वर्षांत भारताने जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये दहाव्या स्थानावरून पाचव्या आणि आता आयएमएफच्या ताज्या अहवालानुसार चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.” केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि मानवी मूल्यांच्या आघाड्यांवरही मोदी सरकारने आपली छाप सोडली आहे. युक्रेनमधून नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी राबवले गेलेले ‘ऑपरेशन गंगा’ हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे.या मोहिमेमुळे केवळ भारतीय नव्हे तर इतर देशांचे नागरिकही भारताच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू लागले.

कोविड महामारीचा संदर्भ देताना त्यांनी भारताच्या लसीकरण मोहिमेचा विशेष उल्लेख केला. “पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीमुळे भारताने २२० कोटी डोसचे सर्वात वेगवान आणि सर्वात मोठे मोफत लसीकरण अभियान यशस्वीपणे पूर्ण केले. अशा प्रकारे कोणत्याही देशाने महामारीला प्रतिसाद दिला नाही,” असे ते म्हणाले.

नड्डा म्हणाले, “एकेकाळी तुष्टीकरण, समाजाला विभागून खुर्ची वाचवण्याचे राजकारण होते. मात्र आज कामगिरी, उत्तरदायित्व, आणि पारदर्शकतेवर आधारित राजकारणाची नवी संस्कृती मोदींनी निर्माण केली आहे. ही आता देशाची नवी ओळख बनली आहे. आज आपण राजकारणात ‘रिपोर्ट कार्ड’ ची संस्कृती आणली आहे. जनतेपुढे आम्ही आमची कामगिरी मांडतो. ही कार्यसंस्कृती, ही जबाबदारीची भावना म्हणजेच मोदींमुळे शक्य झालेली क्रांती आहे.”

या सरकारची वैशिष्ट्ये म्हणजे मजबूत निर्णयक्षमता, आर्थिक शिस्त, आणि सर्वसमावेशकता. “या सरकारने मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांसाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. ही केवळ घोषणांची सरकार नाही, ही सरकार आहे कृतीची, विश्वासाची,” अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वाचे कौतुक केले.

Narendra Modi changed the political culture of the country, J.P. Nadda praised his eleven-year tenure

महत्वाच्या बातम्या