राहुल गांधी यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य, ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून सुनावणी
विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘Rahul Gandhi समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून सुनावणी घ्यावी अशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेली विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली आहे.Rahul Gandhi
पुणे येथील एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्यासमोर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची लंडनमध्ये बदनामी केल्याप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेला बदनामीच्या खटल्याची सुनावणी चालू आहे.
लंडन मध्ये राहूल गांधी यांनी त्यांच्या भाषणात वक्तव्य केले होते की, सावरकरांनी त्यांच्या एका पुस्तकात असे लिहून ठेवलेले आहे की “आम्ही मित्र एकदा जात होतो, तेव्हा काही लोक एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण करित होते, ते बघून खूप आनंद वाटत होता” परंतू सावरकरांनी असे कुठल्याच पुस्तकात लिहून ठेवलेले नाही असे फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे म्हणणे आहे. म्हणून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली. या बदनामीच्या खटल्याची सुनावणी आज न्यायालयात पार पडली.
राहुल गांधी यांचे वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांनी राहुल गांधी यांच्या वतीने या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घ्यावी असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.
हा खटला काही ऐतिहासिक प्रसंगावर व घटनांवर अवलंबून आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य मिळविण्यात किती व कसे योगदान होते. विनायक दामोदर सावरकर यांनी किती पुस्तके लिहिली आहेत. विनायक दामोदर सावरकर यांचे मुस्लिमां विषयी काय विचार होते. विनायक दामोदर सावरकर यांचे ब्रिटिशां बरोबर संबंध कसे होते. अश्या अनेक ऐतिहासिक घटनांवर व संदर्भात या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार आहे. नैसर्गिक न्यायतत्वाला धरून व कायद्यातील तरतुदींनुसार बचाव पक्षाला खटल्याची सुनावणी व उलट तपासणी विस्तृतपणे घेण्याचा अधिकार बचाव पक्षाला आहे.
परंतु या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ म्हणून घेतल्यास बचाव पक्षाला विस्तृत व सखोल पणे साक्षीदारांचा उलटतपास घेता येणार नाही. ‘समन्स ट्रायल’ म्हणून खटल्याची सुनावणी घेतल्यास बचाव पक्षाला या खटल्यात विस्तृत व सखोल पणे बाजू मांडण्याची, वेळोवेळी आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची, प्रसंगी सरकारकडून मागविण्याची परवानगी मिळू शकते. म्हणून या फौजदारी खटल्याची सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून या न्यायालयात व्हावी असा अर्ज अॅड.मिलिंद पवार यांनी केला होता.
वरील अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून राहुल गांधी यांचा अर्ज व विनंती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश श अमोल श्रीराम शिंदे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता इथून पुढे या या खटल्याची नियमित सुनावणी ‘समन्स ट्रायल’ म्हणून होईल.
फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दाखल केलेली सर्व कागदपत्र, राहूल गांधी यांनी लंडनमधील डायसापोरा या कार्यक्रमात केलेल्या भाषणाची सीडी, वर्तमानपत्र, पुस्तके, साक्षीदार यांची प्रतिज्ञापत्रं हि सर्व कागदपत्र आजतागायत बचाव पक्षाला हस्तांतरित केलेली नाहीत. सुनावणी सुरू होण्यापूर्वी बचाव पक्षाला हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने फिर्यादी यांना द्यावेत असा अर्ज अॅड मिलिंद पवार यांनी केला आहे. त्यावर फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे लेखी म्हणणे न्यायालयाने मागितले आहे. खटल्याची पुढील सुनावणी दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे.
समन्स ट्रायल सुनावणी सामान्यत: किरकोळ (साध्या) गुन्ह्यांशी संबंधित असते. यामध्ये आरोपीला न्यायालयाकडून समन्स पाठवली जाते आणि सुनावणी सुरू होते. समजा कोणीतरी सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने आवाज करत होता आणि लोकांना त्रास झाला. पोलिसांनी कलम 290 अंतर्गत तक्रार दाखल केली. हा गुन्हा किरकोळ आहे, म्हणून न्यायालय त्या व्यक्तीला समन्स पाठवते. त्याला अटक नाही, पण न्यायालयात येऊन आपली बाजू सांगावी लागते. ह्या ट्रायलमध्ये जास्त फॉर्मल प्रक्रिया नसते आणि शक्यतो जलद निर्णय दिला जातो. शिक्षा झाली तरी बहुदा दंड होतो.
Rahul Gandhi’s request accepted by special court, hearing to be held as ‘summons trial’ instead of ‘summary trial’
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis जीडीपी 300 बिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी एमएमआर ग्रोथ हब महत्त्वाचे, प्रकल्पांची कामे वेगाने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Harshvardhan Sapkal : सरकारने इंधनावर लावलेले कर आणि सेस यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- Supriya Sule : महिलेचा मृत्यू नसून हत्या, डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, सुप्रिया सुळे यांची मागणी
- Dr. Sushrut Ghaisas तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा