विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांचे विधानसभेतून निलंबन झाले. याचे तोंडदेखले कौतुक केले असले तरी अबू आझमी यांना मदत करण्यासाठी राऊत यांनी भाजपच्या नेत्याचे जुने प्रकरण उकरून काढले आहे. भाजपवर शिवरायांच्या अपमानाबाबत दोन वेगळे कायदे असल्याचा आरोप केला. Abu Azmi
संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी अबू आझमींवर कारवाई झाल्याने कौतुक केले आहे. मात्र “शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपवाल्यांना वेगळा कायदा आहे काय?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी सुधांशु त्रिवेदी यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. तसेच त्यांनी सुधांशु त्रिवेदी यांच्यावर देखील अबू आझमी यांच्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे असे म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांना अटक का झाली नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, अबू आझमी वर कारवाई झाली ! एकदम कडक! मस्त! पण छत्रपती शिवाजी राजाना माफीवीर म्हणणाऱ्या या अतीशहाण्या भाजपा खासदारावर गुन्हा दाखल करुन अटक का झाली नाही? अजूनही वेळ गेलेली नाही! कोरटकर, सोलापुरकर, आणि या सुधांशू त्रिवेदी सारख्याना देखील आझमी चा न्याय का नाही? शिवरायांचा अपमान करणाऱ्या भाजपा वाल्याना वेगळा कायदा आहे काय?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावरुन एक वादग्रस्त विधान केले होते. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य त्यांनी केले होते. यावरुन विधीमंडळात मोठा गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षांनी यावर घोषणाबाजी करत अबू आझमींना कोंडीत पकडले. त्यानंतर अबू आझमी यांच्याविरोधात विधिमंडळात निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून अबू आझमी यांचे सध्या सुरु असलेल्या अधिवेशनातून निलंबन करण्यात आले आहे.
https://youtu.be/g6OxNIqsMno
Raut’s secret help to Abu Azmi? BJP leader’s case has been cleared
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल