Vijay : विजय यांना सभेला परवानगी, करूरमधील भीषण चेंगराचेंगरीत 40जणांचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या ८४ कठोर अटी

विशेष प्रतिनिधी

चेन्नई: : Vijay करूरमध्ये झालेल्या विजय यांच्या प्रचार सभेतील भीषण चेंगराचेंगरीत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी तामिळनाडू पोलिसांनी अभिनेता ते नेते बनलेल्या विजय यांना १८ डिसेंबर रोजी इरोड जिल्ह्यात सभा घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी तब्बल ८४ कठोर अटींसह देण्यात आली असून, पोलिसांनी नियमभंग टाळण्यासाठी अत्यंत कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.Vijay

माध्यमांनुसार, सभेसाठी आयोजकांकडून रु. ५० हजारांची सुरक्षा ठेव घेण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर जागा पूर्ववत स्वच्छ करून सुपूर्द करण्याची जबाबदारीही आयोजकांवर टाकण्यात आली आहे. ही सभा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विजयमंगलम भागात होणार आहे, जो इरोडच्या अगदी शेजारी आहे.Vijay



सभेचे ठिकाण हे सुमारे १६ एकरांचे खाजगी देवस्थानाचे मैदान असून ते हिंदू धार्मिक आणि धर्मादाय endowments विभागाच्या अखत्यारीत आहे. पोलिस परवानगी देण्यासाठी तत्पर होते, परंतु सुरुवातीला एचआर अँड सीई विभागाकडून ‘एनओसी’ मिळाली नसल्याने विलंब झाला.

नंतर विजय यांच्या ‘तामिळगा वेत्त्री कळगम’ (TVK) पक्षाच्या प्रतिनिधींनी देवस्थान अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर समस्या सुटली आणि विभागाने आवश्यक एनओसी देत अंतिम अडथळा दूर केला. त्यानंतर इरोडच्या पोलिस अधीक्षक ए. सुजाता यांनी अधिकारी मंडळासह प्रत्यक्ष ठिकाणाची पाहणी करून सभेला परवानगी दिली.

टीव्हीके चे मुख्य समन्वयक के. ए. सेंगोट्टैयन यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की १८ डिसेंबरच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. त्यांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयमंगलम टोल नाक्याजवळील जागेची पाहणीही केली होती.

या सभेवर करूरमधील प्रचंड दुर्घटनेची सावली अजूनही आहे. २७ सप्टेंबरला विजय यांच्या सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात महिला आणि मुलांचाही समावेश होता. अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी टीव्हीके पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला, मात्र विजय यांचे नाव एफआयआरमध्ये नव्हते.

आता कडक अटी, उच्च सुरक्षा तपासणी आणि सरकारी निरीक्षणाखाली विजयराव यांच्या सभेला परवानगी देण्यात आली असून, ही सभा त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्वाचा टप्पा ठरणार आहे.

Vijay Gets Rally Permission, But Police Impose 84 Strict Conditions After Karur Stampede Killed 40

महत्वाच्या बातम्या