विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray भारतीय बिल्डर पार्टी, फेकनाथ मिंधे असे म्हणत गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा जागामालक आणि बिल्डरांसाठी आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.Aditya Thackeray
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात मुंबई पागडीमुक्त करण्याची घोषणा सरकारने केली. पागडीमुक्त ही फसवी घोषणा असल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले, पागडीमुक्त मुंबई म्हणजे पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना बाहेर घालवण्याचा हा डाव आहे. या सर्व घोषणा बिल्डरांसाठी आहेत. म्हणूनच सर्व भाडेकरूंना कायदेशीर संरक्षण द्या, सक्षम प्राधिकरण कोण आहे, हे कोर्टात स्पष्ट करा आणि उपकरप्राप्त इमारती, सेसच्या इमारती, मोडकळीस आलेल्या किंवा इमारत 60 वर्षे जुनी झाली की पुनर्विकासाची संधी पहिली जागामालकाला नंतर भाडेकरूंना देण्यात यावी. मात्र, गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा जागामालक आणि बिल्डरांसाठी आहे, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख फेकनाथ मिंधे, असा केला.Aditya Thackeray
आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख ‘भारतीय बिल्डर पार्टी’ असा केला. भाजपची धोरणे बिल्डरधार्जिणे आहेत. त्यामुळे त्यांच्या फसव्या घोषणांना भुलू नका, असे आवाहन त्यांनी केले. वांद्रे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना त्याच जागेवर घरे द्या, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईतच घरे द्या, दहिसर – जुहू दरम्यानचे हाय फ्रिक्वेन्सी रडार इतरत्र हलवा, या मागण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आग्रह केला. प्रत्यक्षात रडार योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याचा सरकारने निर्णय घेतला असून गोराईला स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली असल्याचे सरकारने नागपूरमध्ये विधिमंडळात दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. मात्र, हा निर्णय कधी झाला, सहमती कधी दर्शवली, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. मतदारयाद्यांमधील घोळ कोण संपवणार, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
Aditya Thackeray targets Bharatiya Builder Party, Fekanath Mindhe, turban-free Mumbai
महत्वाच्या बातम्या
- राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना हटवण्यासाठी काँग्रेस आक्रमक, नाना पटोले मांडणार ठराव
- Padalkar–Awhad : पडळकर – आव्हाड राड्यात कार्यकर्त्यांना शिक्षा, समितीने केली कारवाईची शिफारस
- चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
- निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून निकाल फिरवण्याचे काम, विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर आरोप