आता फायनलमध्येही इतिहास रचू शकतो विराट Virat Kohli
विशेष प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने ४८.१ षटकांत ४ गडी राखून सामना जिंकला. भारताच्या विजयात विराट कोहलीने ८४ धावांची शानदार खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. विराटने त्याच्या खेळीदरम्यान ५ मोठे विक्रम मोडले.Virat Kohli
विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना ८००० धावा पूर्ण केल्या. त्याने त्याच्या कारकिर्दीतील १५९ व्या सामन्यात ही कामगिरी केली. विराटच्या आधी फक्त सचिन तेंडुलकरनेच धावांचा पाठलाग करताना एकदिवसीय सामन्यात ८,००० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
आयसीसी एकदिवसीय स्पर्धेच्या नॉकआउट सामन्यांमध्ये (क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल) १००० धावा करणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने १०२३ धावा केल्या आहेत. तसेच तो शिखर धवनला मागे टाकत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. विराटने ७४६ धावा केल्या आहेत. शिखरने ७०१ धावा केल्या होत्या.
याशिवाय विराट कोहली आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक २४ अर्धशतके करणारा फलंदाज बनला आहे. त्याने त्याच्या ५३ व्या डावात २४ वे अर्धशतक झळकावले. याआधी सचिनने ५८ डावांमध्ये २३ अर्धशतके झळकावली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने रिकी पॉन्टिंग (१६०) ला मागे टाकले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नॅथन एलिस आणि जोश इंग्लिशचे झेल घेतले. आता त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १६१ झेल आहेत.
जर विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात ४६ धावा केल्या तर तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज बनेल. कोहली १७ सामन्यांच्या १६ डावात १ शतक आणि ६ अर्धशतकांसह ७४६ धावा करून दुसऱ्या स्थानावर आहे. क्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १७ सामन्यांच्या १७ डावात ३ शतकांसह ७९१ धावा केल्या आहेत.
Virat Kohli breaks 5 major records in Champions Trophy semi final
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल